Ashok Chavan | राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्यानं राज्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सुरू असल्याचं बोललं जात आहे. ईडी, सीबीआयचा धाक धाकवून भाजपने अनेक पक्ष फोडले आहेत. हे केवळ राज्यामध्येच नाहीतर देशामध्ये पाहायला मिळत आहे.
गेल्या काही महिन्यांआधी राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. तर त्याआधी शिवसेना पक्षात दोन गट पडले आहेत. यामुळे आता अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी दिलेल्या राजीनाम्यामागे भाजपचं मोठं षडयंत्र असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे अशोक चव्हाण राज्यातील काँग्रेस नेते घेऊन भाजपशी युती करणार का?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी नेमकं आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष का सोडला असावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतर नेत्यांप्रमाणेच अशोक चव्हाण यांच्यावर ईडीची चौकशी सुरू असून याच कारणामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
चव्हाणांवर ईडी चाैकशी आणि राजीनामा
भाऊराव चव्हाण साखर कारखान्यासाठी अर्बन बँकेकडून 200 कोटी एवढं कर्ज घेण्यात आलं होतं. याप्रकरणी कारखाना आणि कुटुंबियांची ईडी चौकशी होणार होती. यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याच्या चर्चा आहेत. भाजपने काढलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचा तपास सुरू आहे.
आदर्श घोटाळा हा राजीनामा देण्यामागील मूळ कारण आहे. भाजपने याआधी देखील अनेकदा विरोधकांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा वापर करत फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. आता अशोक चव्हाण यांच्यावर ही वेळ आल्यानं त्यांनी राजीनाम्याचं पाऊल उचलून पक्षाला राम राम ठोकला आहे.
येत्या 72 तासात राजकीय ट्विस्ट होणार?
राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पुढील दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच येत्या दोन दिवसांध्ये नेमकं काय होईल हे पाहणं उत्कांठावर्धक असणार आहे.
News title – Ashok chavan resign from congress party
महत्त्वाच्या बातम्या
राज्याच्या ‘या’ भागात गारपिटीसह जोराचा पाऊस, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
“केवळ एका राज्यसभेच्या भाकर तुकड्यासाठी…”; शरद पवारांच्या शिलेदारानं अशोक चव्हाणांना सुनावलं
‘…ती फक्त अफवा होती’; श्रीदेवीबाबत बोनी कपूर यांचा मोठा खुलासा
“कायम मलाच …”; Abhishek Bachchan कडून सर्वात मोठा खुलासा
“काँग्रेसने सगळं काही दिलेले नेते…”; नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर टीका