भारतीय क्रिकेटवर शोककळा ! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचं निधन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dattajirao Gaekwad Passes Away | भारतीय क्रिकेट जगतामधून एक वाईट बातमी समोर आली आहे. भारताचे माजी कर्णधार आणि देशातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaekwad Passes Away ) यांचे आज मंगळवारी (13 फेब्रुवारी) निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगतातून शोक व्यक्त केला जात आहे.

त्यांना बीसीसीआयसह दिग्गज क्रिकेटपटूंनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होते. भारताच्या आजी माजी खेळाडूंना सोशल मीडियाद्वारे दत्ता गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दत्ताजीराव गायकवाड यांची कारकीर्द

गेल्या १२ दिवसांपासून बडोद्याच्या रुग्णालयातील आयसीयूमध्ये आयुष्याशी झुंज दिल्यानंतर त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला, असे दत्ताजीराव गायकवाड यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने सांगितले आहे. 1952 ते 1961 दरम्यान त्यांनी भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले आहेत.

तसेच, 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर (Dattajirao Gaekwad Passes Away ) त्यांनी टीम इंडियाचे नेतृत्वही केले आहे.1952 मध्ये लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध त्यांनी पदार्पण केले. त्यांचा अंतिम आंतरराष्ट्रीय सामना 1961 मध्ये चेन्नई येथे पाकिस्तानविरुद्ध होता.

रणजी ट्रॉफीमध्ये गायकवाड यांनी 1947 ते 1961 या काळात बडोद्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 14 शतकांसह 47.56 च्या सरासरीने 3139 धावा केल्या. 1959-60 मध्ये त्यांनी महाराष्ट्राविरुद्ध नाबाद 249 धावा ही सर्वोच्च खेळी केली होती.

दत्ताजीराव यांचा मुलगा अंशुमन गायकवाड यांनीही 1975 ते 1987 दरम्यान 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. दत्ताजीराव यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

News title –  Dattajirao Gaekwad Passes Away

 महत्वाच्या बातम्या- 

‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर होईल लक्ष्मीची कृपा!

‘…म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला’; अशोक चव्हाणांनी स्वत:च सांगितलं कारण

भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

‘विरुष्का’ पुन्हा आई-बाबा होणार?, मोठी बातमी आली समोर

राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल; जाणून घ्या आजचे दर