‘विरुष्का’ पुन्हा आई-बाबा होणार?, मोठी बातमी आली समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. विराटने क्रिकेट सामन्यांपासून काही काळ ब्रेक घेतला आहे. अशातच अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. दोघांनीही याबाबत अधिकृत अशी कोणतीच माहिती दिली नाही. मात्र पत्रकार अभिषेक त्रिपाठीने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली असून त्यात त्याने अनुष्का आणि विराटचा उल्लेख केला आहे.

त्यांच्या या पोस्टने आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामुळे विराटने क्रिकेटपासून ब्रेक का घेतला, अनुष्का खरंच गरोदर आहे की नाही, याबाबत खुलासा करण्यात आला आहे. आता यात किती तथ्य आहे, याबाबत सध्या तरी काहीच सांगता येणार नाही. मात्र, ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार?

‘चार गोष्टी- एक : जे डिविलियर्स म्हणाला होता ते बरोबर होतं. दोन : काही समस्या आहेत ज्या कारणामुळे विराटने परदेशातील डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा आणि कुटुंबीयांसोबत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तीन : त्याने (Virat Kohli ) बीसीसीआयची परवानगी घेऊन या वेळेत कुटुंबीयांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. चार : आपल्याला त्याच्या सुखद भविष्यासाठी प्रार्थना करायला हवी.’, अशी पोस्ट अभिषेक त्रिपाठी यांनी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

ही पोस्ट आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यावर नेटकरी बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. विराट आणि अनुष्काच्या खासगी आयुष्याचा सन्मान न केल्याने काहीनी या पत्रकारावर टीकाही केली आहे. चाहते आता अनुष्काच्या आरोग्याची काळजी करत आहेत. या पोस्टमुळे अनुष्का सध्या तरी गरोदर नसल्याचं म्हटलं जात आहे.

एबी डिविलियर्सचे ‘ते’ विधान चर्चेत

काही दिवसांपुर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा (Virat Kohli ) मित्र एबी डिविलियर्सने त्याच्या युट्यूब चॅनलवर मोठा खुलासा केला होता. विराट दुसऱ्यांदा पिता बनणार आहे आणि तो सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करत असल्याचे त्याने म्हटलं होतं. ही बातमी ऐकून चाहत्यांना बराच आनंद झाला होता. मात्र नंतर त्याने या वक्तव्याबाबत माघार घेतली होती.

त्याने विराट कोहली आणि चाहत्यांची माफीसुद्धा मागितली होती. मी केलेलं वक्तव्य चुकीचं होतं, यासाठी मी त्यांची माफी मागतो. आपल्या सर्वांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करायला हवा, असं एबी डिविलियर्स म्हणाला होता. मात्र अनुष्कावर कशाचे उपचार सुरू आहेत, याची कसलीच माहिती समोर आली नाही.

News Title- Big information about Virat Kohli and Anushka Sharma

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची ‘कसोटी’! स्टार खेळाडू बाहेर, नव्या चेहऱ्याला संधी

रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका

भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो शहिदांचा अपमान ठरेल – उद्धव ठाकरे

“अशोक चव्हाण यांनी आमच्या पक्षात यावं”, केंद्रीय राज्यमंत्र्यांची खुली ऑफर

अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला अजून एक धक्का; आणखी एका नेत्याने सोडला ‘हात’