‘…म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला’; अशोक चव्हाणांनी स्वत:च सांगितलं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला. भाजप प्रवेशाचं कारणही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

‘…म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर मी इम्प्रेस आहे. मी प्रभावित आहे. त्यामुळे मी पक्षात प्रवेश करत आहे, असं अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटलं आहे.

अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर दोन दिवसात निर्णय घेऊ, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. पण ते आजच भाजपवासी झाले.

मोदींनी सबका साथ सबका विकास हे ब्रीद ठेवून अनेक कामे केली. आम्ही मोदींच्या कामावर इम्प्रेस झालो आहे. आम्ही विरोधात असतानाही आम्ही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही चांगल्या कामाचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्याही कामाचं कौतुक केलं आहे. आजपासून पुढे आता आम्ही एकत्र काम करू, असं अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

Ashok Chavan | अशोक चव्हाणांकडून मोदींचं कौतुक

30 वर्षाच्या राजकीय प्रवासाचा बदल करत आहे. भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे. मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करत आहे. वाटचाल करणार आहे, असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय.

मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी सहकार्य केलं. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी आलो. मी आज जास्त बोलणार नाही. मी पक्षात नवीन आहे. योग्यवेळी योग्य गोष्टी बोलणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-  

भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

‘विरुष्का’ पुन्हा आई-बाबा होणार?, मोठी बातमी आली समोर

राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल; जाणून घ्या आजचे दर

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्त्वाची माहिती समोर!

‘भूल भुलैया 3’ मधून मंजुलिकाचं पुनरागमन होणार!