अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्त्वाची माहिती समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ashok Chavan | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यामध्ये खालच्या पातळीचं राजकारण होत असलेलं पाहायला मिळत आहे. अनेक वर्षे काम केलेल्या पक्षासोबत एकनिष्ठ असलेले नेते आपल्या पक्षाला आणि इतर नेत्यांना सोडून भाजपशी हातमिळवणी करताना दिसत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर लागणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे. अशोक चव्हाण (Ashok chavan) यांच्या राजीनाम्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये आजच 13 फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.

अशोक चव्हाण (Ashok chavan) 13 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यांची पत्रकार परिषद होणार आहे.

पक्षप्रवेश कुठं आणि कधी होणार?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12 वाजता मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. अमर राजूरकर हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. 15 फेब्रुवारीला अमित शाह राज्याच्या दौऱ्यासाठी येणार आहेत. यावेळी अशोक चव्हाण हे पक्षप्रवेश करणार होते. मात्र त्यांनी निर्णय बदलला असून भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण राज्यसभेचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी आहे.

चव्हाणांचा काँग्रेसला राम राम

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच पत्रामध्ये माजी विधानसभा सदस्य, असं लिहिलं होतं, यावरून त्यांनी आधीच आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

अशातच आता अशोक चव्हाण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांप्रमाणे काँग्रेसचे नेते आपल्यासोबत घेत भाजपशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

 News Title – Ashok chavan will Enter in BJP 

महत्त्वाच्या बातम्या

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची ‘कसोटी’! स्टार खेळाडू बाहेर, नव्या चेहऱ्याला संधी

रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका

भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो शहिदांचा अपमान ठरेल – उद्धव ठाकरे

“अशोक चव्हाण यांनी आमच्या पक्षात यावं”, केंद्रीय राज्यमंत्र्यांची खुली ऑफर

अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला अजून एक धक्का; आणखी एका नेत्याने सोडला ‘हात’