‘भूल भुलैया 3’ मधून मंजुलिकाचं पुनरागमन होणार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bhool Bhulaiyaa 3 | अभिनेता अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiyaa 3) हा चित्रपट चांगलाच गाजला होता. यातील विद्याने केलेली मंजुलिकाची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याचा दूसरा भागही काढण्यात आला होता. यात विद्या आणि अक्षय ऐवजी दुसऱ्याच कलाकारांची वर्णी लागली होती.

अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिका असलेला Bhool Bhulaiyaa 2 मध्ये ‘मंजुलिका’ ची भूमिकाच नव्हती. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला होता. 2022 मध्ये आलेला हा चित्रपट पहिल्या पार्टसारखा चालला नाही. आता लवकरच याचा तिसरा पार्टही येणार आहे. खुद्द कार्तिक आर्यननेच ही घोषणा केली आहे.

विद्या बालनची ‘भूल भुलैया 3’ मध्ये एंट्री

‘भूल भुलैया 3’ मध्ये चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. कारण, आता या चित्रपटात मंजुलिकाचं पुनरागमन (Bhool Bhulaiyaa 3) होणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे या चित्रपटातून ओरिजनल मंजुलिकाचे पुनरागमन होणार आहे. अर्थात विद्या बालन चित्रपटात पुन्हा दिसणार आहे.

काल (12 फेब्रुवारी) कार्तिक आर्यनने एक व्हिडीओ शेअर करत विद्या बालन परत येत असल्याची माहिती दिली आहे. या बातमीमुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेना झाला आहे. 2007 मध्ये आलेला भूल भुलैया या चित्रपटात विद्याने साकारलेली मंजुलिकाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. ती पुन्हा एकदा दिसणार म्हटल्यावर चाहते आनंदी झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

दुसऱ्या पार्टमध्ये विद्या का नव्हती?

‘भूल भुलैया २’ विद्या का नव्हती याचे कारणही समोर आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. अक्षय आणि विद्या स्क्रिप्टनुसार फिट बसत नव्हते. त्यामुळेच दोघेही या चित्रपटात नव्हते. त्यांना थोड्या वेळासाठी तरी चित्रपटात आणता आलं असंत तर मस्त झालं असतं पण स्क्रिप्टमध्ये तशी कुठे जागाच नव्हती, असे अनीस बज्मी यांनी म्हटले आहे.

‘ Bhool Bhulaiyaa 3 ‘ कधी रिलीज होणार?

चाहते ‘भूल भुलैया 3’ या (Bhool Bhulaiyaa 3) चित्रपटाची आणि अर्थात विद्या बालनचीही आतुरतेने वाट पहात आहेत. हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्या दुसऱ्या पार्टने जगभरातून 266 कोटी रुपये कमावले होते. आता तिसऱ्या पार्टमध्ये विद्या परतणार असल्याने हा नक्कीच जास्त कमाई करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

News Title- Bhool Bhulaiyaa 3 Vidya Balan will play Manjulika in the film 

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची ‘कसोटी’! स्टार खेळाडू बाहेर, नव्या चेहऱ्याला संधी

रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका

भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो शहिदांचा अपमान ठरेल – उद्धव ठाकरे

“अशोक चव्हाण यांनी आमच्या पक्षात यावं”, केंद्रीय राज्यमंत्र्यांची खुली ऑफर

अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला अजून एक धक्का; आणखी एका नेत्याने सोडला ‘हात’