‘त्या कठीण काळात अक्षय कुमार सतत..’; श्रेयस तळपदेच्या पत्नीने केला मोठा खुलासा

Shreyas Talpade | मराठी तथा बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आताच एका मोठ्या संकटातून बाहेर पडला आहे. खरं तर त्याला दुसरा जन्मच मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शूट सुरु असताना अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी निघून गेला. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचं म्हटलं गेलं.

त्यामुळे तो बरेच दिवस रुग्णालयातच होता. या कठीण प्रसंगातून आता तो आणि त्याचं कुटुंब सावरलं आहे. यानंतर तो पुन्हा आपल्या कामावर लागला आहे. अशातच श्रेयसच्या पत्नीने एक मुलाखत देत या अनुभवाबद्दल खुलासा केला. श्रेयसची पत्नी दिप्ती तळपदेने या मुलाखतीमध्ये अभिनेता अक्षय कुमारबद्दल मोठा खुलासा केला.

अक्षय कुमारने श्रेयसला सतत फोन केले

श्रेयस (Shreyas Talpade) जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा, सतत अक्षय कुमार यांचा फोन येत होता. अक्षय श्रेयस तळपदेला शिफ्ट करू असंही म्हणत होता. त्यानंतर सकाळी पण त्यांचा फोन आला होता. मला श्रेयसला बघू द्या, मला त्याला फक्त दोन मिनिटे बघू द्या, असं अक्षय म्हणत होता. मी अक्षयला सांगितलं की, जेव्हा श्रेयसला भेटण्याची इच्छा आहे तेव्हा येऊ शकतात, असा खुलासा दिप्ती तळपदेने केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

यातून अक्षय आणि श्रेयस यांचे नाते किती जवळचे आहे ते दिसून येते. अक्षयने या कठीण परिस्थितीत श्रेयसची साथ देत सतत त्याच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. यामुळे अक्षयचे चाहते कौतुक करत आहेत. दिप्ती तळपदेने पुढे सांगितलं की, टण्याची इच्छा आहे तेंव्हा येऊ शकतात. हेच नाही तर दिप्ती तळपदे हिने सांगितलं की, डायरेक्टर अहमद खान आणि त्यांच्या पत्नी रात्री 11 वाजता श्रेयसला भेटण्यासाठी रूग्णालयात आले होते.

“मी तर मेलो होतो, हा माझा दुसरा जन्म”

श्रेयसने या दुखापतीतून सावरल्यानंतर हा आपला दूसरा जन्म असल्याचं म्हणत चाहत्यांना एक मोठा सल्लाही दिला होता. “मी धूम्रपान किंवा मद्यपान करत नाही. एवढं करूनही जर माझ्यासोबत असं होऊ शकत असेल, तर धुम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या लोकांचं काय होत असेल याची कल्पना करा.”, असं श्रेयस (Shreyas Talpade) म्हणाला होता.

मी ऐकलंय की कोरोनानंतर बऱ्याच जणांना हृदयविकाराचा त्रास होत आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. असा मोलाचा सल्लाही यावेळी श्रेयसने दिला. तसेच, या कठीण प्रसंगी साथ दिल्याबद्दल त्याने पत्नी दीप्ती, चाहते आणि सर्वांचे आभारही मानले होते.

News Title-  Shreyas Talpade wifes big revelation about Akshay Kumar

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची ‘कसोटी’! स्टार खेळाडू बाहेर, नव्या चेहऱ्याला संधी

रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका

भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो शहिदांचा अपमान ठरेल – उद्धव ठाकरे

“अशोक चव्हाण यांनी आमच्या पक्षात यावं”, केंद्रीय राज्यमंत्र्यांची खुली ऑफर

अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला अजून एक धक्का; आणखी एका नेत्याने सोडला ‘हात’