झटपट वजन कमी करायचंय?, मग ‘हा’ डाएट प्लॅन तुमच्यासाठीच

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weight Loss | आपलं वजन हे आपल्या ऊंची आणि वयाप्रमाणे असावं असं नेहमी म्हटलं जातं. अती जास्त वजन (Weight Loss) आरोग्यासाठी नेहमी घातक ठरत असते. वजन अधिक असेल तर अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. दिसण्यावरही त्याचा फरक दिसतो. हे वजन कमी करण्यासाठी बरेच जण आहार कमी करतात. मात्र आहार कमी केल्याने शरीराला पोषक घटक मिळत नाहीत.

यामुळे अशक्तपणा, तसेच शरीरातील पेशी कमी होतात. बरेच जण वजन कमी करण्यासाठी भात खाणेदेखील टाळतात. आता तुमच्यासाठी असाच एक पदार्थ सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. आणि तुमच्या खाण्याच्या इच्छेवरही नियंत्रण येईल. यात तुम्ही तुमच्या आवडीचा भातही खाऊ शकता. कारण, हा पदार्थ भातापासूनच बनलेला आहे. आता ही रेसिपी कशी बनवावी, याची माहिती तुम्हाला खाली दिली आहे.

पौष्टिक नारळाचा भात (कोकोनट राइस )

साहित्य : वजन कमी करणारा (Weight Loss) पौष्टिक नारळाचा भात बनवण्यासाठी तुम्हाला सुक्या नारळाचा गोळा (ठेचून)- 2 वाट्या, बासमती तांदूळ-1 वाटी, शेंगदाणे- 4 चमचे, काजू- 8 ते 10, चणा डाळ (भिजवलेली)- 4 चमचे, उडदाची डाळ (भिजलेली)- 4 चमचे, मोहरी 1 चमचा, जिरे- 1 चमचा, कढीपत्ता- 5 ते 6, लाल मिरची- 1, हिरवी मिरची (बारीक चिरलेली)- 2, मीठ (चवीनुसार), तूप- 2 ते 3 चमचे एवढे साहित्य लागेल.

कोकोनट राइस बनवण्याची पद्धत

तुम्ही जे कोणते तांदूळ वापरत आहात ते धुवून स्वच्छ करा. नंतर 15 मिनिटे ते अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.
एका कढईमध्ये तेल गरम करा.
कढईमध्ये सर्वांत प्रथम शेंगदाणे आणि काजू हलके भाजून घ्या. नंतर याला वेगळे काढून घ्या.
यातच आता एक चमचा तूप टाका. यात मोहरी, जीरा, कढीपत्ता, भिजवलेले उडद आणि चणा डाळ टाकून हलके भाजून घ्या.
पुढे शेंगदाणे आणि काजूही त्यात घाला. सोबतच किसलेले नारळही घाला. सर्व घटकांना एकत्रित चांगले भाजून घ्या.
नंतर यात तांदूळ आणि चवीनुसार मीठ घाला.
या सर्व मिश्रणाला प्रेशर कुकर मध्ये टाकून साधारण 1.5 कप पाणी घालून दोन शिट्टी होईपर्यंत गॅसवर ठेवा.
तुमचा पौष्टिक कोकोनट राइस तयार झालेला असेल.

इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा कोकोनट राइस बनवू शकता. वजन (Weight Loss)  कमी करण्यासाठी नेहमी उकडलेल्या भाज्याच पर्याय नसतात. तर, हा चविष्ट पदार्थ खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता. नारळ हा अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजयुक्त खजिना आहे. त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, मॅग्नेशियम, तांबे, सेलेनियम, मँगनीज, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम सारखे घटक असतात.

त्यामुळे आहारात नारळाचा समावेश असणे आवश्यक असते.नारळ तेलही तुम्ही वापरू शकता. ही सोपी पद्धत वापरुन तुम्ही दररोज एक वेळेला कोकोनट राइस खाऊ शकता.हा चिकिस्तक उपाय तर नाही, पण तुम्ही एक पौष्टिक पदार्थ म्हणून याकडे पाहू शकता.

News title – Weight Loss Diet Plan

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, 15 फेब्रुवारीला खेळणार अखेरचा सामना

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याचं खरं कारण आलं समोर!

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची ‘कसोटी’! स्टार खेळाडू बाहेर, नव्या चेहऱ्याला संधी

रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका

भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो शहिदांचा अपमान ठरेल – उद्धव ठाकरे