‘वेलेंटाईन वीक’ मध्ये ‘या’ वस्तूंच्या खरेदीत वाढ!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Valentine Day | वेलेंटाईन डे (Valentine Day) हा दिवस तरूण तरूणींसाठी खास दिवस असतो. प्रेयसी प्रियकर आजचा दिवस स्पेंड करताना दिसतात. आता वेलेंटाईन डे हा वेलेंटाईन वीक झाला आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. कारण वेलेंटाईन डे च्या आधी एक हप्ताभर तरूण आणि तरूणी हा दिवस साजरा करत आहेत. यामुळे वेलेंटाईन डे असं म्हणण्याऐवजी वेलेंटाईन वीक म्हटलं तरीही हरकत नाही.

वेलेंटाईन डे (Valentine Day) हा 14 फेब्रुवारी रोजी असतो हे सर्वांनाच माहिती आहे. यादिवसाआधी इतरही ‘डे’ज असतात. रोज डे, चॉकलेट डे, हग डे, प्रपोज डे मात्र वेलेंटाईन डे हा इतर ‘डे’जपेक्षा चर्चेत असतो. याच दिवशी केवळ कॉलेज तरूणीच नाहीतर काही विवाहबंधनात अडकलेली जोडपीदेखील या दिवशी आपल्या प्रेमाचा इजहार करतात. आपल्या जोडप्यासोबत फिरायला जात एकमेकांना भेटवस्तू देतात.

‘वेलेंटाईन डे’ला मुंबईच्या बाजारपेठा गजबजल्या

‘वेलेंटाईन डे’ला आपल्या प्रियकराला किंवा आपल्या प्रेयसीला कोणतं गिफ्ट देता येईल असा अनेकांना प्रश्न असतो. मुंबईच्या क्रॉफर्ड, नटराज मार्केट, लिंकिंग रोड, दादर, घाटकोपर, कुलाबा कॉजवे अशा बाजारपेठेत जोडप्यांची गर्दी जमू लागली आहे. आपल्या प्रेयसीला नेमकं काय आवडेल, तिची आवड निवड, तिची गरज या सर्व बाबींचा विचार  करत जोडपे आपल्या प्रेयसी-प्रियकराला वेलेंटाईन गिफ्ट देतात. सध्यास्थितीत ऑनलाईनचा जमाना असल्यानं अनेक तरूण ऑनलाईन स्वरूपात वस्तूंची खरेदी करतात. यामुळे अशा दिवसांच्या तोंडावर दुकानदारांची, ज्वेलरी शॉपींची फजिती होते, मात्र मुंबईमध्ये तसं काही नाही.

मुंबईकरांना एखाद्या वस्तूच्या किंमतीचा भाव कशापद्धतीने कमी करावा आणि एखादी वस्तू किती रूपयांना विकत घ्यावी याचं कौशल्य असतं. कारण मुंबईमध्ये अनेक बाजारपेठा आहेत. त्याठिकाणी त्यांना एखादी वस्तू अगदी सवलतीच्या दरामध्ये मिळते. त्यामुळे आपल्या प्रियकराला एखादी भेटवस्तू देण्यासाठी फार पैसै मोजावे लागत नाहीत. यामुळे मुंबईकर जोडपी ऑनलाईनपेक्षा बाजारपेठेत जाऊन वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत.

तरूणाईंचा टेडी खरेदीकडे कल

भेटवस्तू देणं हे जोडप्याच्या वयानुसार असू शकतं. आता तरूणांबाबत विचार केल्यास तरूणांची अधिक मागणी ही मग्ज, पेन, आर्टीफिशिअल ज्वेलरी, वॉच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेडींची मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत आहे.

ऑनलाईनचा फारसा परिणाम नाही

सध्या ऑनलाईच्या माध्यमातून अनेकजण भेटवस्तू घेत असतात. मात्र ऑनलाईन दिसणाऱ्या वस्तू बऱ्याचदा डिलिव्हरीनंतर जशाच्या तशा दिसतातच असं नाही. त्यामुळे अनेकजण हे ऑफलाईन म्हणजेच स्टोअर्समध्ये जात वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात अनेकदा जोडप्यांना आपल्या प्रियकराने घेतलेली ऑनलाईन भेटवस्तू आवडेलच असं नाही.

News Title – Valentine day news Update

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, 15 फेब्रुवारीला खेळणार अखेरचा सामना

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याचं खरं कारण आलं समोर!

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची ‘कसोटी’! स्टार खेळाडू बाहेर, नव्या चेहऱ्याला संधी

रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका

भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो शहिदांचा अपमान ठरेल – उद्धव ठाकरे