Jacqueline Fernandez | सुकेश चंद्रशेखर 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या तुरुंगात आहे.या प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं (Jacqueline Fernandez) नाव डिसेंबर 2021 मध्ये समोर आलं होतं. त्यानंतर ईडीच्या चौकशीत जॅकलीनलाही आरोपी ठरवलं गेलं. याप्रकरणात तिची अनेकदा चौकशी झाली.
सुकेश आणि जॅकलीन बराच काळ नात्यात होते. सध्या सुकेश जेलमध्ये आहे. इथूनच तो जॅकलीनला प्रेमाचे पत्र लिहीत असतो. कदाचित या कारणाने आता जॅकलीनने थेट त्याच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे जॅकलीनने तक्रार केली आहे.
काही रिपोर्टनुसार जॅकलिन फर्नांडिसने पोलिस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहिले आहे. तिने पोलिस आयुक्तांकडे तिच्या सुरक्षेसाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता एका विशेष युनिटला जॅकलीनच्या या तक्रारीची प्राथमिक चौकशी करण्यास सांगितलं असल्याचं म्हटलं जात आहे.
Jacqueline Fernandez चे पत्र
‘मी एक जबाबदार नागरिक आहे.मात्र, एका प्रकरणात मी अडकले आहे. विशेष सेलने नोंदवलेल्या खटल्यातील फिर्यादी साक्षीदार म्हणून मी तुम्हाला हे पत्र लिहिलं आहे. माझ्यावर मानसिक दबाव टाकला जात आहे. तसेच मला धमक्या मिळत असल्याने मी हे पत्र लिहित आहे. सुकेश हा व्यक्ती या प्रकरणातील आरोपी आहे. मंडोली कारागृहात बसून तो पब्लिक डोमेनद्वारे खुलेपणाने मला धमकावत आहे’, असे पत्र जॅकलिनने (Jacqueline Fernandez) लिहिले आहे.
माझ्या जीवाला धोका असून माझं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सुकेशविरोधात आयपीसी कलमांअंतर्गत एफआयआर नोंदवावा, अशी विनंतीदेखील जॅकलीनने केली आहे. सुकेश तुरुंगातून तिला त्रास देत असल्याचा दावाही अभिनेत्रीने केला आहे. तुरुंगात बसून तो मला कसं काय धमकावत आहे, यावरही तिने सवाल केला आहे. तक्रारीत तिने वृत्तपत्रातील तीन कात्रणेही जोडली आहेत. जी डिसेंबर 2023 मध्ये प्रकाशित झाली आहेत.
जॅकलीनचा गंभीर आरोप
दरम्यान, दिल्ली पोलिस सुकेश चंद्रशेखर विरुद्ध 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग आणि खंडणी प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसही (Jacqueline Fernandez) अडकली आहे. जॅकलीनवर आतापर्यंत प्रेमाचा वर्षाव करणारा सुकेश तिच्याविरोधात पावलं उचलत आहे. याचीच तक्रार तिने आता थेट पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
News title – Jacqueline Fernandez complaint against Sukesh Chandrashekhar
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, 15 फेब्रुवारीला खेळणार अखेरचा सामना
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याचं खरं कारण आलं समोर!
इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची ‘कसोटी’! स्टार खेळाडू बाहेर, नव्या चेहऱ्याला संधी
रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका
भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो शहिदांचा अपमान ठरेल – उद्धव ठाकरे