अभिनेत्री, राजकारणी अन् अध्यात्माचा मार्ग; 35 व्या वर्षी संपवलं जीवन, कोण होती मल्लिका?

Mallika Rajput

Mallika Rajput | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतसोबत काम करणाऱ्या मल्लिका राजपूतने आत्महत्या करून सर्वांनाच धक्का दिला. गायिका मल्लिकाने कंगनासोबत रिव्हॉल्वर रानी या चित्रपटात काम केले होते. पण तिच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. मल्लिकाने आत्महत्या करण्याचे कारण काय असावे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे. मल्लिका राजपूतचा प्रवास हा वादग्रस्त राहिला आहे.

गायिका आणि अभिनेत्री मल्लिका राजपूत आता या जगात नाही. वयाच्या 35 व्या वर्षी तिने टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवले. विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिकाने आत्महत्या केली आहे. तिचा मृतदेह सुलतानपूर येथील तिच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, तिने हे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नाही.

35 व्या वर्षी संपवलं जीवन

मल्लिका राजपूतने कंगना रनौतसोबत रिव्हॉल्वर रानी या चित्रपटात काम केले होते. तिच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचवेळी पीएम रिपोर्ट आल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

दरम्यान, चित्रपटांव्यतिरिक्त मल्लिका अनेकदा वादांमुळे चर्चेत असायची. इंदूरचे आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्यावर आरोप करून मल्लिका प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या घटनेनंतर काही दिवसांनी भय्यू महाराजांनी आत्महत्या केली. याशिवाय मल्लिकाही भाजपशी संबंधित होती. 2018 मध्ये तिने बलात्काऱ्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप करत पक्ष सोडला. अनेकदा ती या वादांमुळे चर्चेत राहिली.

Mallika Rajput चा वादग्रस्त प्रवास

मल्लिका तिच्या विधानांमुळे चर्चेत असायची. राजकारणातून बाहेर पडल्यानंतर तिने एक वेगळा मार्ग निवडला होता. भारतीय जनता पक्षाने बलात्कार करणाऱ्या आरोपींचे समर्थन केल्याने तिने पक्षाला रामराम केले. मग पुढे मल्लिकाने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.

फिल्मी कारकीर्द कमकुवत होऊ लागली तेव्हा तिने अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला. तिने स्थानिक कपाली महाराजांकडून गृहस्थ संन्यासाची दीक्षा घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी रात्री तिचा कुटुंबीयांशी वाद झाला. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसही त्यांच्या घरी पोहोचले होते. यानंतर रात्री काय घडले आणि मल्लिकाचा मृतदेह कसा झाला याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

News Title- Mallika Rajput, who worked with Bollywood actress Kangana Ranaut, committed suicide at the age of 35
महत्त्वाच्या बातम्या –

“माझ्या जीवाला धोका..”,जॅकलीन फर्नांडिसच्या आरोपाने खळबळ

‘वेलेंटाईन वीक’ मध्ये ‘या’ वस्तूंच्या खरेदीत वाढ!

झटपट वजन कमी करायचंय?, मग ‘हा’ डाएट प्लॅन तुमच्यासाठीच

“…म्हणून लोक तुमच्यावर थुंकत आहेत”, अशोक चव्हाणांवर संजय राऊत भडकले

भारतीय क्रिकेटवर शोककळा ! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचं निधन

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .