“भाजपने राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली पण मी…”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया’ आघाडी तर राज्यात महाविकास आघाडी मोर्चेबांधणी करत आहे. मागील काही दिवस महाविकास आघाडीतील नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती. पण, अखेर प्रकाश आंबडेकरांची वंचित महाविकास आघाडीचा भाग झाली असून लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि वंचित एकत्र लढतील. प्रकाश आंबेडकर सातत्याने भाजपवर टीका करत असून आता त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

‘लोकशाही’ या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आताच्या घडीला प्रकाश आंबेडकरांसमोरील मोठे आव्हान असलेल्या भाजपबद्दल त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याआधी या पदासाठी आपल्याला विचारण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला.

राष्ट्रपतीपदाची ऑफर पण…

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रपतीपदासाठी मला भाजपकडून ऑफर मिळाली होती. यासाठी त्यांनी विचारणा केली पण मी साफ नकार दिला. तुम्ही लवकरच वयाचे 70 वर्षे पूर्ण करणार आहात, त्यामुळे राष्ट्रपती व्हायला आवडेल का? असे भाजपने विचारले होते. त्यावर माझ्याकडे अद्याप 10 वर्षे शिल्लक असल्याचे मी सांगितले. तुम्ही मला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात का? मी तुमच्या विरोधात आहे हे मी स्पष्टपणे भाजपला सांगितले.

तसेच 2024 मध्ये सर्व पक्षांनी एकत्रित येऊन चांगली कामगिरी केल्यास चित्र काहीसे वेगळे असू शकते. त्यामुळे मला अशी विचारणा करू नका. मी तुमच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या. असे देखील मी सत्ताधारी भाजपला ठणकावून सांगितले असल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला. खरं तर महाविकास आघाडीचा भाग होण्यापूर्वीच आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केली होती.

Prakash Ambedkar यांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडीचा भाग झाल्यानंतर आंबेडकरांनी ‘इंडिया’ आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले होते. महाविकास आघाडी आहे, राहील पण ‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य मला माहित नसल्याचे त्यांनी सांगितले होते. आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेते. अलीकडेच उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दल भाजपप्रणित एनडीएत सामील झाला.

‘इंडिया’ आघाडीचे घटक पक्ष बाहेर पडत असल्याचा दाखला देत आंबेडकरांनी सांगितले की, ‘इंडिया’ आघाडीप्रमाणे महाविकास आघाडी संपणार नाही अशी आशा मला आहे. कारण आम्हाला कोणत्याही परिस्थितीत भाजपला पराभूत करायचे आहे. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आम्हाला तारीख सुचवेल अशी आशा आहे.

News Title- Prakash Ambedkar of Vanchit Bahujan Aghadi has made a big secret that BJP has offered me the post of President
महत्त्वाच्या बातम्या –

अभिनेत्री, राजकारणी अन् अध्यात्माचा मार्ग; 35 व्या वर्षी संपवलं जीवन, कोण होती मल्लिका?

भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेणं हीच मोदींची गॅरंटी; उद्धव ठाकरेंची सडकून टीका

“माझ्या जीवाला धोका..”,जॅकलीन फर्नांडिसच्या आरोपाने खळबळ

‘वेलेंटाईन वीक’ मध्ये ‘या’ वस्तूंच्या खरेदीत वाढ!

झटपट वजन कमी करायचंय?, मग ‘हा’ डाएट प्लॅन तुमच्यासाठीच