…तर तुमचे पैसे बुडालेच म्हणून समजा; सेबीचा गुंतवणूकदारांना इशारा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

SEBI | चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात आहेत. पण सावधान… कारण बाजार नियामक सेबीने (SEBI) गुंतवणूकदारांना अशा नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे, ज्या खात्रीशीर चांगला आणि मोठा परतावा मिळेल असा दावा करतात. अशा बनावट कंपन्या आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा इशारा सेबीने (SEBI Advisory) दिला आहे. शेअर बाजारात आमिषाला बळी ठरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

त्यामुळे गुंतवणूकदारांना यापासून दूर राहावे लागेल. विश्वास संपादन करण्यासाठी सेबीकडे नोंदणीकृत असल्याचा दावा देखील केला जातो. शेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या, नियम बनवणाऱ्या सेबीने गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घेण्यास सांगितले आहे. सेबीमध्ये नोंदणीकृत असल्याचा दावा करणारी कंपनी देखील तपासायला हवी असेही सेबीने नमूद केले.

बनावट कंपन्यांपासून सावध राहा

तसेच कंपनीची माहिती आणि पडताळणी सेबीच्या वेबसाइटवरून करता येते. याशिवाय सेबीशी संपर्क साधूनही कंपन्यांची चौकशी करता येते. अशा कंपनीवर सेबीने काय कारवाई केली आहे हेही गुंतवणूकदारांनी तपासून मगच गुंतवणुकीचा विचार करावा असे सेबीने सांगितले.

दरम्यान, सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवून अशा बनावट कंपन्या आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म लोकांची फसवणूक करत असल्याचे सेबीला आढळून आले आहे. एकदा त्यांनी विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणूकदारांना मोठ्या आणि खात्रीशीर परताव्याच्या योजना सांगतात. अशा योजना अनेकदा खोट्या ठरतात. त्यामुळे अशा कोणत्याही दाव्यावर तुमचे पैसे गुंतवू नका, असा सल्ला सेबीने दिला आहे.

SEBI चा गुंतवणूकदारांना इशारा!

सेबीने गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे निर्णय घेताना काळजी घेण्यास सांगितले आहे. तुमचे पैसे हुशारीने गुंतवा. तपासानंतर सेबीकडे नोंदणीकृत कंपन्यांमध्येच पैसे गुंतवत आहोत का याची खात्री करा. कोणत्याही गुंतवणूकदाराने खात्रीशीर आणि चांगला परतावा मिळेल अशा खोट्या दाव्यांना बळी पडू नये. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास गुंतवणूकदार आर्थिक नुकसान आणि फसवणूक टाळू शकतात, असेही सेबीने सांगितले.

अनेकदा चांगला परतावा मिळेल या आशेने गुंतवणूकदार अशा आमिषांचे बळी ठरतात. मोठ्या आणि निश्चित परताव्याची हमी कोणालाही देता येत नाही, असे सेबीने म्हटले आहे. गुंतवणूकदारांनी नीट विचार करून सेबीकडे नोंदणीकृत कंपन्यांमध्येच पैसे गुंतवावेत, असे सातत्याने सांगितले जाते.

News Title- SEBI advises to beware of bogus companies claiming to offer good returns which can lead to huge fraud
महत्त्वाच्या बातम्या –

“भाजपने राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली पण मी…”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

अभिनेत्री, राजकारणी अन् अध्यात्माचा मार्ग; 35 व्या वर्षी संपवलं जीवन, कोण होती मल्लिका?

भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेणं हीच मोदींची गॅरंटी; उद्धव ठाकरेंची सडकून टीका

“माझ्या जीवाला धोका..”,जॅकलीन फर्नांडिसच्या आरोपाने खळबळ

‘वेलेंटाईन वीक’ मध्ये ‘या’ वस्तूंच्या खरेदीत वाढ!