“भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ashok Chavan | काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष सोडताना त्यांनी काँग्रेसवर अनेक आरोपही केले आहेत. एकीकडे काँग्रेस भाजपविरुद्ध देश पातळीवर लढत असताना पक्षातीलच लोक साथ सोडत आहेत. यावरून चव्हाण (Ashok Chavan ) यांच्यावर विरोधक टीकेचे बाण सोडत आहेत. आता ठाकरे गटाकडूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखातून अशोक चव्हाणांवर टीका

‘भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा’, असं वातावरण महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशातच तयार झालं आहे. ‘अब की बार चारसौ पार’ ही मोदी गर्जनाही याच मोहिमेचा एक भाग आहे. अर्थात, भारतीय जनता पक्षाची 400 जागांची दिल्ली अभी बहोत दूर है. इतर पक्षांतील शक्तिमान भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन देखील ते जेमतेम दोनशेचा आकडा पार करू शकतील, असं वातावरण आहे. याच घाबरलेल्या अवस्थेत भाजप रोज इतर पक्षांतील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये टाकून स्वच्छ करत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून ते भाजप वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

“भाजपच्या मोठ्या पराभवाची ही गॅरंटी आहे”

शहिदांचा अपमान करणाऱ्यांच्या स्वागताच्या कमानीवर पताका चिकटवण्याचं काम फडणवीस-मोदी यांना करावं लागतंय. भाजपच्या मोठ्या पराभवाची ही गॅरंटी आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

पाप धुण्यासाठी पूर्वी गंगास्नान करण्याची परंपरा होती. आता भाजप वॉशिंग मशीन हीच गंगोत्री झाली आहे. अशोक चव्हाण यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काँग्रेसने काय द्यायचे कमी केले होते? त्यांचे पिताश्री शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्रात तीनेक वेळा मुख्यमंत्री, त्याआधी वर्षानुवर्षे मंत्री होते. केंद्रात अर्थ, संरक्षण, गृह अशी महत्त्वाची खाती सांभाळली. अशोक चव्हाण (Ashok Chavan ) हेसुद्धा राज्यात प्रदीर्घ काळ मंत्री व मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या रक्तात काँग्रेस होती. तरीही ते गेले. ज्या व्यक्तींना काही कारणांसाठी असुरक्षित वाटते त्यांना भाजपचे धुलाई यंत्र वैचारिक निष्ठेपेक्षा आकर्षित करते, अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली आहे.

मुंबईतील कफ परेड या श्रीमंत भागात शहीद सैनिकांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेने एक उंच टॉवर उभा राहिला. मूळ इमारत पाच-सहा माळ्यांचीच होणार होती. त्यावर अशोक चव्हाण कृपेने32 माळे उभे राहिले. कोट्यवधींचा व्यवहार त्यात झाला. हे सर्व प्रकरण ‘सीबीआय’कडे गेले. त्यात अनेक अधिकाऱ्यांना अटका झाल्या. अनेक राजकारण्यांनी त्या इमारतीत गुंतवणूक केली. याच ‘आदर्श’ इमारतीत अशोक चव्हाण अॅण्ड फॅमिलीचे पाच-सहा फ्लॅट असल्याचे उघड झाले. भारतीय सैन्यातील शहिदांच्या विधवा पत्नींचे फ्लॅटस् हडपण्याचे हे प्रकरण तेव्हा भाजपने लावून धरले, अशी टीका सामनामध्ये केली आहे.

अशोक चव्हाण यांनी शहिदांचा अपमान केला

अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. स्वतः पंतप्रधान मोदी हे तेव्हा नांदेडला आले होते आणि अशोक चव्हाण यांनी ‘आदर्श’ घोटाळ्यात शहिदांचा अपमान केला, असे भावपूर्ण शब्दांत सांगितले होते. शहिदांचा अपमान झाला हे सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. शहिदांचा अपमान करणाऱ्यांना माफ करू नका, असं त्यांनी सांगितलं.

एवढेच नव्हे, तर ‘‘मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीमधील कारगील शहिदांच्या विधवा पत्नींच्या फ्लॅटस्ची ज्यांनी चोरी केली, हे फ्लॅटस् ज्यांनी आपली सासू, मेव्हणी यांच्या नावाने करून घेतले ते अशोक चव्हाण ‘चौकीदार’ कसे होऊ शकतील? तुम्ही कोणत्या चौकीदारांच्या हाती देश सोपवणार आहात? देशाला या प्रश्नांचे उत्तर हवे आहे,’’ असे मोदींनी काँग्रेस श्रेष्ठींना त्या वेळी सुनावले होते. मग आता काय झाले? शहीद जवानांच्या विधवा पत्नींच्या फ्लॅटस्ची चोरी करणारा ‘भ्रष्ट चौकीदार’ आज भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये आल्याने एकदम ‘स्वच्छ चौकीदार’ झाला का?, असा सवाल सामनात करण्यात आला.

News Title – Thackeray group criticism of Ashok Chavan

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

“आदर्श म्हणून माझ्याकडे पाहा मी…”, अभिजीत बिचुकलेचा तरूणांना सल्ला

ऐश्वर्याच्या सौंदर्याची कंगनालाही पडली भुरळ; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केली प्रशंसा

शेतकरी आंदोलन! …तर यावेळी देखील होणार हजारो कोटींचे नुकसान, व्यापाऱ्यांना चिंता

इशान किशनला घमंडीपणा नडणार; BCCI कडक कारवाई करण्याच्या तयारीत