Kangana Ranaut | बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केले. ऐश्वर्याने ‘और प्यार हो गया’ आणि ‘इरुवर’ या चित्रपटांमधून बॉलिवूड आणि तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अप्रतिम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीत गरूडझेप घेतली. तिच्या अभिनय कारकिर्दीत ऐश्वर्याने 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ऐश्वर्या राय ही कायम प्रसिद्धीच्या झोतात असते. ऐश्वर्याच्या सौंदर्याचे आणि तिच्या अभिनय कौशल्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असते. आता अभिनेत्री कंगना रनौतने ऐश्वर्याची सौंदर्यावरून प्रशंसा केली आहे. कंगना रनौत तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. समाजात घडणाऱ्या चालू घडामोडींवर कंगना नेहमी भाष्य करत असते.
ऐश्वर्याच्या सौंदर्याची कंगनाला भुरळ
भल्याभल्यांना भिडणारी कंगना अनेकदा अडचणीत देखील सापडली आहे. कंगनाला तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी देखील ओळखले जाते. ती राजकारणात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. अनेकदा तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचे उघडपणे कौतुक केले. अलीकडेच पार पडलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देखील अभिनेत्रीने हजेरी लावली होती.
आता कंगनाने बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायसाठी एक इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली, ज्या माध्यमातून तिने ऐश्वर्याच्या सौंदर्याची प्रशंसा केली. बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगनाने पोस्ट करत ऐश्वर्याचे कौतुक केले आहे. तिने ऐश्वर्याचा एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिची तिच्या अनेक चित्रपटांमधील झलक दिसते. “ऐश्वर्याच्या दैवी सौंदर्याची प्रशंसा करण्यासाठी ही स्टोरी आहे”, अशा आशयाचे कॅप्शन कंगनाने दिले.
View this post on Instagram
Kangana Ranaut ने शेअर केला व्हिडीओ
कंगना प्रदर्शित होत असलेल्या इतर चित्रपटांबद्दल नेहमी भाष्य करत असते. कंगनाने याआधी विक्रांत मेसीला ‘झुरळ’ असे म्हटले होते. याशिवाय रणबीर कपूरची ॲनिमल चित्रपटावरून खिल्ली उडवली होती. तसेच लोकांना महिलांवरील अत्याचार असलेलेच चित्रपट आवडतात अशी खंत व्यक्त केली होती.
अलीकडेच बॉक्स ऑफिसवर आलेल्या 12वी फेल चित्रपटाचे कंगनाने कौतुक केले होते. कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
News Title- Bollywood actress Kangana Ranaut Post For Aishwarya Rai Bachchan
महत्त्वाच्या बातम्या –
शेतकरी आंदोलन! …तर यावेळी देखील होणार हजारो कोटींचे नुकसान, व्यापाऱ्यांना चिंता
इशान किशनला घमंडीपणा नडणार; BCCI कडक कारवाई करण्याच्या तयारीत
…तर तुमचे पैसे बुडालेच म्हणून समजा; सेबीचा गुंतवणूकदारांना इशारा!
“भाजपने राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली पण मी…”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट
अभिनेत्री, राजकारणी अन् अध्यात्माचा मार्ग; 35 व्या वर्षी संपवलं जीवन, कोण होती मल्लिका?