“आदर्श म्हणून माझ्याकडे पाहा मी…”, अभिजीत बिचुकलेचा तरूणांना सल्ला

Abhijeet bichukale

Abhijeet Bichukale | बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) अनेकदा कोणत्यानं कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतो. कधी राजकीय पटलावर मोठ मोठ्या नेत्यांना आव्हान देताना दिसतो. तर कधी कवितेचे धडे देतात. अभिजीत बिचुकलेला आपण सर्वच क्षेत्रात पाहिलं आहे. आधी तो बिगबॉसमध्य होता. त्याने साताऱ्यातून निवडणूक लढवली. तर साताऱ्यामध्ये उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवण्यावरून त्याची अधिक चर्चा झाली होती. तर वरळी मतदारसंघातून तो ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंविरोधातही निवडणूक लढवणार होता.

अशातच आता अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) हा आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. राजकारण, कविता आणि बिगबॉसनंतर तो आता संगीत क्षेत्रासाठी चर्चेत आहे. ‘वेलेंटाईन डे’च्या दिवशी त्याच्या कवितांचा अल्बम सकाळी 11 च्या सुमारास प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या अल्बममध्ये त्यानं लव्हर बॉयची भूमिका केली आहे. यावर आता त्यानं प्रतिक्रिया दिली आहे

“मी आता अभिनेता, संगीतकार, गीतकार, कवीमनाचा नेता म्हणून दिसणार आहे.” त्यानंतर तो म्हणाला की “कॉलेजच्या दिवसात जो काय करत होतो आणि जे काही करता आलं नाही ते या व्हिडीओच्या माध्यमातून केलं आहे. हा व्हिडीओ बनवण्यासाठी त्याच्या मित्रपरिवाराने चांगली मेहनत केली”, अभिजीत बिचुकले यांनी त्यांचे आभार मानले.

“आदर्शवत म्हणून माझ्याकडे पाहा”

“आपल्याला जे काही करायचं आहे त्याचे ध्येय आणि धोरण असावं. व्यसनाच्या मागे लागू नका. आदर्श म्हणून अभिजीत बिचुकले म्हणजे माझ्याकडे पाहा”, असं वक्तव्य अभिजीत बिचुकले यांनी केलं आहे. “मी गीतकार आहे, गायक आहे, संगीतकार आहे कवी आहे आणि मी राजकीय नेता देखील आहे. माझ्यातला एक जरी गुण घेतला तरीही तुम्ही खूप मोठं होऊ शकता. पण शेवटी तुमचं नशीब तुमच्या बरोबर…”, असं देखील तो म्हणाला आहे.

अभिजीत बिचुकले हा कोणत्या न् कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतो. त्याने अनेकदा निवणडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा राहिला होता. यामुळे त्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. तो अनेकदा सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर बोलताना दिसत आहे.

बिगबॉसमध्ये बिचुकले

हिंदी बिगबॉसमध्ये 15 व्या सिझनमध्ये अभिजीत बिचुकलेची वाईल्ड कार्ट इंट्री झाली होती. तर त्यानं मराठी बिगबॉसमध्येदेखील पाऊल टाकलं होतं. तसेच आपल्या पत्नीला राज्याची पहिली मुख्यमंत्री बनवायची आहे असं देखील त्यानं वक्तव्य केलं होतं, या वक्तव्यानं तो चर्चेत आला.

News Title – Abhijeet Bichukale album song news update

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय क्रिकेटवर शोककळा ! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचं निधन

‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर होईल लक्ष्मीची कृपा!

‘…म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला’; अशोक चव्हाणांनी स्वत:च सांगितलं कारण

भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

‘विरुष्का’ पुन्हा आई-बाबा होणार?, मोठी बातमी आली समोर

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .