महाराष्ट्रात सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत; बक्षीस म्हणून मिळणार चक्क 1BHK फ्लॅट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sangli News | महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत हा खेळ तसा फार जुना आहे. आता सांगली (Sangli News) जिल्ह्यात सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने याचे आयोजन केले जाणार आहे. यातील आकर्षक बाब म्हणजे विजेत्याला बक्षीस म्हणून चक्क 1BHK फ्लॅट मिळणार आहे.

या बैलगाडी शर्यतीचे सांगलीच्या कासेगावमध्ये आयोजन करण्यात आले आहे. कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्याला चक्क वन बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याने याची जोरदार चर्चा होत आहे.

विजेत्याला 1BHK फ्लॅट मिळणार

या शर्यतीमध्ये प्रथम विजेत्यासोबतच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडीलाही मोठी रक्कम मिळणार आहे. यांना सात आणि पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी (Sangli News) महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातून 200 हुन अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार आहेत.

1 लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत होणार शर्यत

या बैलगाडा स्पर्धेसाठी 10 एकरांवर मैदान तयार करण्यात आले असल्याची माहिती शरद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहीगडे यांनी दिली आहे. त्यामुळे या शर्यतीची सर्वांनाच प्रतिक्षा असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथील शरद लाहीगडे फाउंडेशनकडून याचे आयोजन केले गेले आहे.

येत्या 17 फेब्रुवारीला ही भव्य शर्यत होणार आहे. या शर्यतीमधील मिळणारे बक्षीस हे तब्बल 20 लाखांचे असणार आहे. म्हणजेच 20 लाखांचा फ्लॅट बक्षीस म्हणून दिला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात (Sangli News) या शर्यतीची एकच चर्चा होत आहे. यासाठी शेतकरी जोरदार तयारी करत आहेत.

शरद लाहीगडे फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहीगडे यांनी या शर्यतीसाठी सांगलीमध्ये भव्य तयारी केली आहे. या सोहळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

News Title- Sangli News Sangli Bailgada Sharyat 2024

महत्त्वाच्या बातम्या –

‘असं वैऱ्यासोबतही घडू नये’, भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे रडला, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

“आदर्श म्हणून माझ्याकडे पाहा मी…”, अभिजीत बिचुकलेचा तरूणांना सल्ला

ऐश्वर्याच्या सौंदर्याची कंगनालाही पडली भुरळ; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केली प्रशंसा

शेतकरी आंदोलन! …तर यावेळी देखील होणार हजारो कोटींचे नुकसान, व्यापाऱ्यांना चिंता