‘असं वैऱ्यासोबतही घडू नये’, भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे रडला, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shreyas Talpade | मराठी तथा बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आताच एका मोठ्या संकटातून बाहेर पडला आहे. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने तो बराच दिवस रुग्णालयात होता. या कठीण परिस्थितीतून सावरत तो पुन्हा आपल्या कामाला लागला आहे.

त्याचा ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. यावेळी कार्यक्रमात श्रेयसला अश्रू अनावर झाले. त्याची पत्नी दीप्तीही यावेळी भावूक झाल्याचं दिसून आलं. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘ही अनोखी गाठ’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा पर पडलं. यावेळी त्याची पत्नी दीप्ती तळपदेदेखील प्रेक्षकांमध्ये बसली होती. श्रेयसला बघून तिचेही डोळे पाणावले. श्रेयसने पुन्हा दमदार कमबॅक करत सर्वांनाच चकित केले आहे. हृदयविकाराचा झटका आला तो काळ सर्वांत वाईट काळ असल्याचं त्याने यावेळी म्हटलं आहे. त्याला पुन्हा तंदुरुस्त पाहून चाहतेही आनंदित झाले आहेत.

असं कोणत्या वैऱ्यासोबतही घडू नये..

“माझ्याकडे बोलायला शब्द उरले नाहीयेत. माझ्यासोबत जे झालं त्याची उजळणी खरंच नको, पण असं कोणत्याही वैऱ्यासोबतही घडू नये. या काळात मला लोकांचा आशीर्वाद, प्रेम आणि प्रार्थना लाभल्या. सर्वांनी खूप प्रेमाने माझ्यासाठी सर्वकाही केलं. या जन्मात मी त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही. माझ्यासाठी हा माझा नवीन जन्मच आहे. माझी आणि माझ्या पत्नीची मदत केलेल्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो.”, असे श्रेयस (Shreyas Talpade) यावेळी म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीमध्ये श्रेयसने या दुखापतीतून सावरल्यानंतर हा आपला दूसरा जन्म असल्याचं म्हणत चाहत्यांना एक मोठा सल्लाही दिला होता. “मी धूम्रपान किंवा मद्यपान करत नाही. एवढं करूनही जर माझ्यासोबत असं होऊ शकत असेल, तर धुम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या लोकांचं काय होत असेल याची कल्पना करा.”, असं श्रेयस (Shreyas Talpade) म्हणाला होता.

मी ऐकलंय की कोरोनानंतर बऱ्याच जणांना हृदयविकाराचा त्रास होत आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे, असा मोलाचा सल्लाही यावेळी श्रेयसने दिला. तसेच, या कठीण प्रसंगी साथ दिल्याबद्दल त्याने पत्नी दीप्ती, चाहते आणि सर्वांचे आभारही मानले होते.

‘ही अनोखी गाठ’ मधून श्रेयसचं कमबॅक

महेश मांजरेकर यांच्या ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटात श्रेयस (Shreyas Talpade) मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या 1 मार्चला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे सर्वांनाच आता चित्रपटाची प्रतिक्षा लागली आहे.

News Title- Shreyas Talpade Hi Anokhi Gath Movie Trailer Released

महत्त्वाच्या बातम्या –

ऐश्वर्याच्या सौंदर्याची कंगनालाही पडली भुरळ; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केली प्रशंसा

शेतकरी आंदोलन! …तर यावेळी देखील होणार हजारो कोटींचे नुकसान, व्यापाऱ्यांना चिंता

इशान किशनला घमंडीपणा नडणार; BCCI कडक कारवाई करण्याच्या तयारीत

…तर तुमचे पैसे बुडालेच म्हणून समजा; सेबीचा गुंतवणूकदारांना इशारा!

“भाजपने राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली पण मी…”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट