Girish mahajan | गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण हे वेगळ्याच वळणावर गेलेलं पाहायला मिळत आहे. भाजप सरकार आल्यापासून हुकूमशाहीचा उदय होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचं जे झालं आता पुन्हा इकदा काँग्रेसबाबत तेच होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आता शरद पवार गटाच्या नेत्यानंही भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Girish mahajan)
भाजप नेते गिरीश महाजन Girish mahajan) यांनी याबाबत माहिती दिली आहे. गिरीश महाजन हे अनेकदा विविध कारणांनी चर्चेत आले होते. आता महाजनांनी शरद पवार गटाचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलथापालथ होताना दिसत आहे. ज्या नेत्यांची भाजपच्या वाटेवर जाण्याची चर्चा सुरू आहे त्यांनी याप्रकरणार आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. याबाबत माध्यमांनी एकनाथ खडसे यांना प्रश्न केला असता, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना दावा केला आहे. “भाजपच्या प्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांचे अनेक निरोप येत आहेत. याबाबत मला काहीच विचारणा झाली नाही. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. त्यांची वर काही लाईन असेल तर त्यांनी लावावी”, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे.
काय म्हणाले खडसे?
भाजपत प्रवेश करणार या केवळ अफवाच आहेत. माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा याबाबत अफवा पसरवल्या आहेत. असा दावा करत त्यांनी ट्वीट केलं आहे.
गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 13, 2024
अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर
“अमित शाह हे 15 फेब्रुवारीला राज्यातील जळगाव, संभाजीनगर आणिअकोल्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. अमित शाहा हे जळगामध्ये युवा संमेलनामध्ये विद्यार्थी आणि तरूणांशी संवाद साधणार आहेत. तसेच जळगावमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. यावेळी कोणताही पक्षप्रवेश होणार नसल्याचं”, महाजन म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर हल्ला केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाढीवरून केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. “राऊत यांच्या जिभेला हाड नाही. ते कोणाला काहीही बोलतात. दाढीवाले रावण म्हणत आहेत. त्यांनी विचार कारावा आणि मग बोलावं, राऊत यांनी काहीही बोलू नये”, असं गिरीश महाजन यांनी राऊतांवर टीका केली.
News Title – Girish mahajan statement on Eknath Khadse trying to return BJP
महत्त्वाच्या बातम्या
‘विरुष्का’ पुन्हा आई-बाबा होणार?, मोठी बातमी आली समोर
राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल; जाणून घ्या आजचे दर
अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्त्वाची माहिती समोर!
‘भूल भुलैया 3’ मधून मंजुलिकाचं पुनरागमन होणार!
‘त्या कठीण काळात अक्षय कुमार सतत..’; श्रेयस तळपदेच्या पत्नीने केला मोठा खुलासा