दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वे विभागात होणार बंपर भरती

Railway Recruitment 2024 | देशात बेरोजगार तरुणांची संख्या वाढताना दिसते आहे. त्यामुळे तरुण मिळेल ते काम करण्याला पसंती देत आहेत. आता तरुणांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. विशेष म्हणजे दहावी पास विद्यार्थ्यांसाठी (Railway Recruitment 2024 ) नोकरीची सुवर्णसंधी असणार आहे. त्यामुळे दहावी पास तरुणही भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी असल्याने तरुणांनी ही संधी गमावू नये. ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवली जाणार आहे. रेल्वे विभागाकडून बंपर भरती केली जाणार आहे.

‘इतक्या’ जागांची भरती होणार

रेल्वे विभागाकडून तब्बल 9000 पदांसाठी भरती केली जाणार आहे. indianrailways.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. याठिकाणी अर्ज करण्याची सर्व पद्धत सांगितलेली आहे. 9 मार्च 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

यासाठी शेवटची तारीख 8 एप्रिला 2024 ठेवण्यात आली आहे. (Railway Recruitment 2024 ) तुम्हाला ऑनलाइनच याचा अर्ज करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया टेक्निशियन या पदांसाठी होत आहे. 18 ते 36 वयाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 9 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे.

आवश्यक पात्रता काय?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच ITI उत्तीर्ण असणे देखील गरजेचे आहे. यासोबतच उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक, एसएसएलसी किंवा समकक्ष परीक्षा (Railway Recruitment 2024) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवाराकडे NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असायला हवे. त्यामुळे आता पासूनच याच्या परीक्षेची तयारी सुरू करावी.

‘अशी’ होईल निवड प्रक्रिया

रेल्वे भरतीसाठी उमेदवाराला कम्प्युटर बेस्ड चाचणी द्यावी लागणार आहे. CBT1 उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला पुढे CBT2 परिक्षेत सहभागी होता यईल. ही परीक्षा पास झाल्यावर उमेदवाराच्या (Railway Recruitment 2024 ) कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. ही पडताळणी झाल्यानंतर उमेदवाराला वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येईल. नंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

News Title-  Railway Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या –

‘असं वैऱ्यासोबतही घडू नये’, भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे रडला, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

“आदर्श म्हणून माझ्याकडे पाहा मी…”, अभिजीत बिचुकलेचा तरूणांना सल्ला

ऐश्वर्याच्या सौंदर्याची कंगनालाही पडली भुरळ; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केली प्रशंसा

शेतकरी आंदोलन! …तर यावेळी देखील होणार हजारो कोटींचे नुकसान, व्यापाऱ्यांना चिंता