प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या; धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह

Mallika Rajput | एका प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिकेने आपल्याच घरात आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ही अभिनेत्री दुसरी कुणी नसून विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिका राजपूत (Mallika Rajput) आहे.

मल्लिका राजपूतने अभिनेत्री कंगना रणौतसह चित्रपटात काम केलं आहे. ती कंगनाबरोबर ‘रिव्हॉल्वर रानी’ या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसली होती. तसेच, गायक शानच्या ‘यारा तुझसे’ या म्युझिक अल्बममधून मल्लिकाला प्रसिद्धी मिळाली होती.

​​मल्लिका राजपूतची आत्महत्या

मल्लिकाच्या (Mallika Rajput) निधनाबद्दल तिच्या कुटुंबीयांनी माहिती दिली आहे. तिची आई सुमित्रा सिंह यांनी म्हटलं की, ती नेहमीप्रमाणे रात्री खोलीत गेली आणि दरवाजा आतून बंद केला. सकाळी तिने दरवाजा न उघडल्यामुळे घरातील सदस्यांनी कसा तरी दरवाजा उघडला. त्यावेळी मल्लिका पंख्याला लटकलेली दिसली. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

आता मल्लिका राजपूतने आत्महत्या का केली, याबाबत पोलिस तपास करत आहेत. या बातमीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेही गळफास घेत आत्महत्या केली होती. तेव्हा सुशांतच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता.

​​मल्लिका राजपूतने BJP मध्ये प्रवेश केला होता

सुशांत आत्महत्या प्रकरणी अजूनही तपास सुरू आहे. आता अजून एका अभिनेत्रीने आपले जीवन गळफास घेत संपवले आहे. तिने नेमकी आत्महत्या का केली, याबाबत आता चर्चा होत आहे. मल्लिकाने राजकारणामध्येही नशीब आजमावले होते.

मल्लिका राजपूतने (Mallika Rajput) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, 2018 मध्ये तिने पक्षाला रामराम ठोकला. मनोरंजन आणि राजकारणात तिला हवं तसं यश न मिळाल्याने पुढे ती धार्मिक वाटेवर वळली होती. आता तिच्या आत्महत्येमुळे एकच चर्चा रंगली आहे.

News title – Suicide of Mallika Rajput   

 महत्वाच्या बातम्या- 

भारतीय क्रिकेटवर शोककळा ! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचं निधन

‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर होईल लक्ष्मीची कृपा!

‘…म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला’; अशोक चव्हाणांनी स्वत:च सांगितलं कारण

भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

‘विरुष्का’ पुन्हा आई-बाबा होणार?, मोठी बातमी आली समोर