सिंगल तरूणांनाही साजरा करता येणार Valentine Day, ‘या’ गोष्टी नक्की करा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Valentine Day | वेलेंटाईन डे (Valentine Day) हा दिवस 14 फेब्रुवारीला संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. तरूण आणि तरूणींमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी अधिक रस असतो. काही लग्न झालेली मंडळी देखील आपल्या बायकोला निरनिराळ्या भेटवस्तू देतात. जोडप्यांसाठी हा दिवस एखाद्या सणाहून काही कमी नसतो. जोडपे आजच्या दिवशी मनमुरादपणे आनंद लुटतात. एकमेकांशी भावनिक नातेसंबंध वाढवण्यासाठी आजचा दिवस प्रत्येक जोडप्यासाठी प्रेमाचा बोनसच असतो जणू. मात्र सिंगल तरूण-तरूणींनी काय करायचं असा प्रश्न पडतो. मात्र आता सिंगल मंडळींनाही हा वेलेंटाईन डे साजरा करता येणार आहे.

प्रत्येक तरूण-तरूणींना आपलाही जोडीदार असावा असं वाटतं, मात्र सर्वांच्या नशिबी आपल्या जोडीदारासोबत वेलेंटाईन डे (Valentine Day) साजरा करावा इतपत सुदैव येत नसतं. मात्र सिंगल असले तरीही आता सिंगल भावांनो आणि ताईंनो आपणही वेलेंटाईन डे साजरा करू शकता, यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. सर्वात प्रथम सिंगल मंडळींना स्वत:वर प्रेम करायला शिका. कारण या दिवसाचं महत्त्व हे प्रेमालाच आहे.

आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी कराव्या

स्वत:ला सर्वात जास्त महत्त्व द्या. तुम्ही अप्रतिम स्पा ट्रीटमेंट करू शकता. स्वत:ला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोय ती गोष्ट करा. तुम्हाला आजचा दिवस तुमच्या म्हणण्यानुसार घालवायचा आहे तसा घालवा. तुम्ही आजच्या दिवशी एखाद दुसरा छंद जोपासा, पुस्तक वाचा, आपल्याला जे योग्य आणि आनंददायी वाटतं ते करा.

आपल्या सिंगल मित्रांसोबत फिरायला जा

सिंगल मंडळींचे काही मित्र मैत्रीणी हे सिंगल असतीलच असं नाही. तर काही बंधनात असतील असंही नाही मग सिंगल मंडळींनी आपल्या सिंगल मित्रांसोबत कुठे तरी ट्रेकिंगसाठी जावं. मित्रांसोबत वेळ घालवत जीवनाचा आनंद घेऊ शकता. जोडीदारासोबत फिरणं आणि मित्रांसोबत फिरणं या दोन्ही बाबींमध्ये तफावतता असल्याचं देखील बोललं जातं.

आपल्या छंदांवर प्रेम करा 

अनेकदा सिंगल मंडळींना आपल्या आवडीनिवडींप्रमाणे आपला छंद जोपासण्याचा आनंद घ्यावा. जोडप्यांना एकमेकांना वेळ द्यावा लागतो, म्हणून त्यांना आपला छंद जोपासता येत नाही. पेंटींग, डान्स, फोटोग्राफी, तुमच्या आवडीनिवडीने प्रेमाचा दिवस साजरा करू शकता.

आपण आजच्या दिवशी गरजूंना मदत करा, अनाथाश्रमला तसेच वृद्धाश्रमाला भेट देऊ शकता. ही देखील एक प्रेमाची पोचपावती असेल.

News Title – Valentine day celebrate by single peoples

महत्त्वाच्या बातम्या

‘असं वैऱ्यासोबतही घडू नये’, भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे रडला, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

“आदर्श म्हणून माझ्याकडे पाहा मी…”, अभिजीत बिचुकलेचा तरूणांना सल्ला

ऐश्वर्याच्या सौंदर्याची कंगनालाही पडली भुरळ; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केली प्रशंसा

शेतकरी आंदोलन! …तर यावेळी देखील होणार हजारो कोटींचे नुकसान, व्यापाऱ्यांना चिंता