‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; डबल फायदा

Coal India Company Dividend Stock

Dividend Stock | भारतातील नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेली कोल इंडिया कंपनीने मोठा लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने 2023-24 च्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरवर (Dividend Stock) मोठा लाभांश देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आज ज्यांच्याकडे याची शेअर आहेत त्यांची लॉटरीच लागली आहे.

या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनीने प्रत्येक शेअरवर 5.25 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. तसेच कंपनी बोर्डाने मुख्य अर्धिकारी म्हणून मुकेश अग्रवाल यांच्या नियुक्तीलाही मंजुरी दिली आहे.

डिव्हिडेंडसाठी 20 फेब्रुवारी रेकॉर्ड डेट

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कोल इंडियाने प्रति शेअर 15.25 रुपयेचा पहिला अंतरिम लाभांश जाहीर केला होता. यावर्षी पुन्हा कंपनीने लाभांश जाहीर केला आहे. यंदा कंपनीने (Dividend Stock) या डिव्हिडेंडसाठी 20 फेब्रुवारी रेकॉर्ड डेट ठेवली आहे. हा लाभांश आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच म्हणजे 12 मार्च रोजी देण्यात येईल.

कंपनी या आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांना लाभांश रुपात 20.5 रुपये देणार आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 9,069 कोटी रुपये होता. मागच्या वर्षी हा नफा 7,755 कोटी रुपये होता. नेट प्रॉफिट गेल्या सप्टेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत 33 टक्के वाढून 6,800 कोटी रुपयांवर पोहचला.

शेअरधारकांना दुहेरी फायदा

कोल इंडियाचा शेअर सोमवारी 4.80 टक्क्यांनी घसरला होता. हा शेअर तेव्हा 434.30 रुपयांवर होता. या स्टॉकने गेल्या सहा महिन्यात 85 टक्क्यांचा परतावा दिला आहे. त्यामुळे एक वर्षात गुंतवणूकदारांची (Dividend Stock) गुंतवणूक दुप्पटीहून अधिक झाली आहे.

त्यामुळे ज्या शेअरधारकांनी या कंपनीत जास्त गुंतवणूक केली. त्यांना या वर्षात दुहेरी फायदा होणार आहे. शेअर वधारल्याने त्यांची बक्कळ कमाई तर झालीच आहे. पण, आता त्यांना डिव्हिडंडमधून पण फायदा होणार आहे.

News Title- Coal India Company Dividend Stock 

महत्त्वाच्या बातम्या –

‘असं वैऱ्यासोबतही घडू नये’, भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे रडला, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

“आदर्श म्हणून माझ्याकडे पाहा मी…”, अभिजीत बिचुकलेचा तरूणांना सल्ला

ऐश्वर्याच्या सौंदर्याची कंगनालाही पडली भुरळ; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केली प्रशंसा

शेतकरी आंदोलन! …तर यावेळी देखील होणार हजारो कोटींचे नुकसान, व्यापाऱ्यांना चिंता

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .