“स्वतःची औकात ओळख, अंथरुणावर पडून…”; नारायण राणेंचा जरांगे पाटलांना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narayan Rane | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊन अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं या मागणीसाठी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 10 फेब्रुवारीला पुन्हा एकदा आरक्षणाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवरच नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलेले ट्वीट चर्चेत आलं आहे.

आज जरांगे यांच्या उपोषणाचा 5 वा दिवस आहे. या दरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषध न घेतल्याने त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. त्यात जरांगे पाटील उपचार घेण्यासही नकार देत आहेत. अशातच भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. यासोबतच हे आंदोलन एक नाटक असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे, अशी टीका राणे (Narayan Rane) यांनी केली आहे.

तसेच पुढे त्यांनी म्हटलं की, “पंतप्रधान जेव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत!”, असा टोला नारायण राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.

जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. घराघरामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही. मराठ्यांची लाट कशी उसळली आहे ती बघा. सरकारचे डोळे काय गेले आहेत का? अक्कल नाही का?, अशा शब्दात सरकारवर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने राज्यभर सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलेल्या ट्वीटमुळे हा वाद अजूनच चिघळणार असल्याचे म्हटले जात आहे.

News Title-  Narayan Rane criticized Manoj Jarange  

महत्त्वाच्या बातम्या –

‘असं वैऱ्यासोबतही घडू नये’, भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे रडला, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

“आदर्श म्हणून माझ्याकडे पाहा मी…”, अभिजीत बिचुकलेचा तरूणांना सल्ला

ऐश्वर्याच्या सौंदर्याची कंगनालाही पडली भुरळ; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केली प्रशंसा

शेतकरी आंदोलन! …तर यावेळी देखील होणार हजारो कोटींचे नुकसान, व्यापाऱ्यांना चिंता