Ashok Chavan | गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये नेत्यांचे जोरात इनकमिंग पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजप अव्वल स्थानावर आहे. कारण भाजपसोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी काँग्रेसला टाटा करत भाजपमध्ये मंगळवारी प्रवेश केला. यामुळे आता काँग्रेसमधील इतर नेतेही लवकरच भाजपमध्ये येतील, असा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मोठ्या बंडानंतर आता राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते काँग्रेसमध्येच राहतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय शिरसाट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षात अधिक इनकमिंग होताना दिसत आहे. भाजपमध्ये अनेक काँग्रेस नेते पक्षप्रवेश करतील आणि ठाकरे गटाचे नेते आमच्या पक्षात येतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
संजय शिरसाट यांचा दावा खरा ठरला
आता अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावर आता संजय शिरसाट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, “मी 13 एप्रिलला सांगितलं होतं की अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार आहेत. मात्र अशोक चव्हाण यांनी संजय शिरसाट काय ज्योतिष आहेत का? अशी टीका केली, पण आज हे भाकित खरं ठरलं आहे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.
“फेब्रुवारी महिन्यातील हा पंधरवडा ब्रेकिंग न्यूजचा आहे. आमच्या पक्षामध्ये देखील इमकमिंग चालू आहे. उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्या पक्षामध्ये येणार आहेत. आता संजय राऊत किती दिवस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राहणार आहेत हे सांगता येणार नाही. तेच आता ठाकरेंची साथ सोडून इतर पक्षात जातील”, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. याप्रकरणावर ईडीचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या साखर कारखान्यासाठी तब्बल 200 कोटींचं कर्ज घेतलं होतं. यामुळे साखर कारखाना आणि कुटुंबाची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
आदर्श घोटाळ्याप्रकरणी तपास सुरू होता. यावर अशोक चव्हाण यांना माध्यमांनी विचारलं असता अशोक चव्हाण यांनी यावर उत्तर दिलं आहे. “या मुद्द्यावर हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागला आहे. त्याची कायदेशी जी प्रोसेस असेल ती पूर्ण करेल. हा एक राजकीय अपघात म्हणावा लागेल”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
News Title – Ashok chavan join BJP
महत्त्वाच्या बातम्या
“…म्हणून लोक तुमच्यावर थुंकत आहेत”, अशोक चव्हाणांवर संजय राऊत भडकले
भारतीय क्रिकेटवर शोककळा ! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचं निधन
‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर होईल लक्ष्मीची कृपा!
‘…म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला’; अशोक चव्हाणांनी स्वत:च सांगितलं कारण