भारत ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वात 2024 चा वर्ल्ड कप जिंकेलच; जय शाह यांचं मोठं विधान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jay Shah | भारतात मागील वर्षी वन डे विश्वचषक पार पडला. सलग दहा सामने जिंकून अंतिम फेरी गाठणाऱ्या यजमान भारतीय संघाला किताबापासून एक पाऊल दूर राहावे लागले. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून विश्वचषक उंचावला. तेव्हापासून रोहित शर्मा पुढचा विश्वचषक खेळणार का आणि संघाचे नेतृत्व कोणाकडे असेल? हा प्रश्न भारतीय चाहत्यांना सतावत होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मोठ्या कालावधीनंतर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मागील महिन्यात या जोडीने अफगाणिस्तानविरूद्धची ट्वेंटी-20 मालिका खेळली.

येत्या जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आगामी विश्वचषकात भारतीय संघाची धुरा कोण सांभाळणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. पण, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली असून रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व असेल हे स्पष्ट केले. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारत विश्वचषक खेळणार नाही.

जूनमध्ये ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार

विश्वचषकामध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी बुधवारी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केला. जय शाह यांनी सांगितले की, जून-जुलैमध्ये यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या आयसीसी मेगा स्पर्धेत रोहित भारतीय संघाचा कर्णधार असेल. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून अनुत्तरित असलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नामकरण आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष निरंजन शाह यांच्या नावावर करण्यात आले आहे. गुरुवारपासून राजकोटच्या या स्टेडियममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी या स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये जय शाह बोलत होते.

 

Jay Shah मोठी घोषणा

जय शाह म्हणाले की, आम्ही 2023 विश्वचषकाच्या फायनलमध्ये हरलो असलो तरी सलग 10 सामने जिंकून आम्ही सर्वांची मने जिंकली. मला पूर्ण विश्वास आहे की 2024 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही बार्बाडोसमध्ये भारताचा तिरंगा नक्कीच फडकवू.

दरम्यान, रोहित शर्मा ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर झाला तेव्हापासून हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत होता. आगामी काळात देखील त्याच्याकडेच संघाची धुरा असेल असा तर्क लावला जात होता. पण आता याला पूर्णविराम मिळाला आहे. हार्दिकला आता रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियामध्ये खेळावे लागणार आहे, तर रोहित आयपीएलमध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.

News Title- BCCI Secretary Jai Shah has said that Rohit Sharma will be the captain of Team India in the 2024 World Cup and I am confident that India will win the tournament

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ बड्या नेत्याचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला, म्हणाले…

“रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय योग्यच”, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?, पुण्यातील मोदी बागेत बैठक सुरू

भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी हटवली, देशाच्या तिरंग्याखाली खेळण्यासाठी खेळाडूंचा मार्ग मोकळा

‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; डबल फायदा