शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?, पुण्यातील मोदी बागेत बैठक सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकीय पातळीवर अनेक ट्वीस्ट घडताना दिसत आहेत. आपलेच नेते आपल्याच लोकांना दगा देताना दिसत आहेत. फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चा आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पन्नास वर्षे काँग्रेसमध्ये कारभार केला आणि ते भाजपमध्ये गेले आहेत. आता शरद पवार (Sharad Pawar) गट देखील काँग्रेसमध्ये जाण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आला आणि निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांचं असल्याचा दावा केला आहे. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्थापन केलेला पक्ष शरद पवार यांच्या हातून गेला आहे. यामुळे शरदचंद्र पवार हा गट आता काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती दिली आहे.

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडणूक आयोगानं घोषित केला आहे. यासाठी शरद पवार गट आपल्या गटासाठी चिन्ह शोधत असल्याचं बोललं जात आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. आता पक्ष हातातून गेल्याने शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची घोषणा केली असल्याच्या चर्चा आहेत, अशी माहिती शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी दिली आहे.

काँग्रेसमध्ये विलिन होण्याचा शरद पवार गटाचा निर्णय?

“शरद पवार यांनी बैठक घेतली आहे. बैठकीत शरद पवार गट हा काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार आहे. हा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा असून याबाबत तेच निर्णय घेतील. पवारांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहेत”, असं मंगलदास बांदल म्हणाले आहेत.

बैठकीत ‘या’ नेत्यांची उपस्थिती

पुण्यातील मोदी बागेमध्ये शरद पवार गटाची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बैठक आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, अनिल देशमुख आणि बाळासाहेब पाटील देखील उपस्थित आहेत.

एकाबाजूने शरद पवार गटाला पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटामध्ये अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार कोणता उमेदवार देणार हे देखील पाहणं उत्कंठावर्धक आहे. तसेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला निरोप दिला. यामुळे शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा आहेत.

News Title – Sharad pawar ncp join congress

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांबाबत ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा!

हार्दिक पांड्याची राजकारणात एन्ट्री?, अमित शहांसोबतचा फोटो व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या; धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह

दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वे विभागात होणार बंपर भरती

शरद पवारांना धक्का, ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर?