“तुमच्यासारखी लोक इतिहास बदलतात कारण…”, शिल्पा शेट्टीने मोदींचे मानले आभार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shilpa Shetty | 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले. या ऐतिहासिक सोहळ्याला बॉलिवूडमधील कलाकार अमिताभ बच्चन-रणबीर कपूरसह अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. भारतीय जनता पक्षाने शिल्पा शेट्टीचे या पत्रावरून कौतुक केले असून ते सोशल मीडियावर शेअर केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. अनेक बॉलिवूड कलाकार राम मंदिराच्या उद्घाटनच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण शिल्पा शेट्टी दिसली नव्हती. मात्र, तिने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास पत्र लिहिले आहे. या पत्रात तिने पंतप्रधानांचे खूप कौतुक केले असून त्यांचे आभार मानले आहेत. शिल्पाचे हे पत्र भाजपच्या एक्स हँडलवरून शेअर करण्यात आले आहे.

तुम्ही इतिहास बदलत आहात – शिल्पा

पत्राद्वारे शिल्पा शेट्टीने राम मंदिर बांधल्याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. “काही लोक इतिहास वाचतात, तर काही लोक इतिहासातून शिकतात. पण तुम्ही इतिहास बदलत आहात. नरेंद्र मोदींनी रामजन्मभूमीचा पाचशे वर्षांचा इतिहास बदलला आहे. यासाठी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानले. ‘नमो राम! जय श्री राम”, असे शिल्पाने म्हटले.

भाजपा महाराष्ट्राने शिल्पा शेट्टीचे पत्र शेअर करत म्हटले की, सुप्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. ५ शतकांपासून श्रीरामांना वनवास घडत होता. अखेर तो वनवास संपला. तेही मोदीच्या प्रयत्नांमुळे… यासाठीच शिल्पा यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. तुम्हीही पंतप्रधानांचे आभार मानणारे पत्र namo@bjpcc.org या ईमेल आयडीवर मेल करा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

Shilpa Shetty चे मोदींना पत्र

शिल्पा शेट्टीने लिहिलेल्या पत्राचे भारतीय जनता पक्षाने कौतुक केले आहे. अभिनेत्रीचा खास संदेश शेअर करताना भाजपने लिहिले की, शिल्पा शेट्टीने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. नरेंद्र मोदींच्या हस्ते भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले.

दरम्यान, 22 जानेवारी 2024 हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे. या दिवशी रामललाचा अभिषेक करण्यात आला. या खास प्रसंगी अयोध्येत दिग्गजांनी सहभाग घेतला आणि हे भव्य दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. या यादीत अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराना आणि इतर कलाकारांचा समावेश होता.

News Title- Bollywood actress Shilpa Shetty has written a letter to Prime Minister Narendra Modi praising him for building the Ram temple in Ayodhya
महत्त्वाच्या बातम्या –

भारत ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वात 2024 चा वर्ल्ड कप जिंकेलच; जय शाह यांचं मोठं विधान

‘या’ बड्या नेत्याचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला, म्हणाले…

“रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय योग्यच”, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?, पुण्यातील मोदी बागेत बैठक सुरू

भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी हटवली, देशाच्या तिरंग्याखाली खेळण्यासाठी खेळाडूंचा मार्ग मोकळा