युवराज सिंगच्या नेतृत्वात खेळणार पाकिस्तानचे खेळाडू; बाबर आझमसह अनेकांचा सहभाग

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Yuvraj Singh | भारतीय क्रिकेटचा सिक्सर सिंग युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. आपल्या स्फोटक खेळीने भल्याभल्या गोलंदाजांना गारद करणारा युवी आता एका वेगळ्या भूमिकेत दिसेल. युवराज सिंगची लीजेंड्स क्रिकेट ट्रॉफीच्या (LCT) दुसऱ्या सत्रासाठी न्यूयॉर्क सुपरस्टार स्ट्रायकर्सचा (Legends Cricket Trophy 2024) कर्णधार आणि आयकॉन खेळाडू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरं तर पाकिस्तानी संघातील खेळाडू यावेळी युवराजच्या नेतृत्वात खेळतील.

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमसह त्याचे सहकारी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. न्यूयॉर्क सुपरस्टार स्ट्रायकर्सच्या संघात पाकिस्तानचा बाबर आझम, इमाम-उल-हक, नसीम शाह, आसिफ अली आणि मोहम्मद आमिर यांचा समावेश आहे. प्रथमच पाकिस्तानच्या विद्यमान संघातील शिलेदार एखाद्या भारतीय खेळाडूच्या नेतृत्वात खेळणार आहे.

बाबरसह अनेकांचा सहभाग

याशिवाय अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खान, रहमानउल्ला गुरबाज, वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड आणि श्रीलंकेचा मथिसा पाथिराना हे देखील युवराजच्या संघाकडून खेळणार आहेत. न्यूयॉर्क सुपरस्टार स्ट्रायकर्सने बुधवारी एका निवेदनात म्हटले की, युवराज सिंगचा आमच्या संघात झालेला समावेश यामुळे संघात कौशल्य आणि नेतृत्वाची भर पडेल, ज्यामुळे स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी न्यूयॉर्क सुपरस्टार स्ट्रायकर्सची तयारी मजबूत होईल.

Yuvraj Singh कडे कर्णधारपद

ही स्पर्धा 90 चेंडूंच्या (15 षटके) स्वरूपात 7 ते 18 मार्च दरम्यान श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे. गतवर्षी गाझियाबादमध्ये पहिले सत्र 20 षटकांच्या स्वरूपात खेळले गेले. पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्याने इंदूर नाईट्स आणि गुवाहाटी ॲव्हेंजर्स यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

पाकिस्तानी संघातील खेळाडू पुढचे काही दिवस पाकिस्तान सुपर लीगमध्ये व्यग्र असतील. 17 तारखेपासून पाकिस्तानच्या या लीगचा नववा हंगाम खेळवला जात आहे. सहा संघ ट्रॉफीसाठी मैदानात असतील. आयपीएलच्या धरतीवर सुरू झालेली पाकिस्तान सुपर लीग ही स्पर्धा शेजारील देशात लोकप्रिय आहे.

बाबर आझमला अलीकडेच पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले. वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीन चेहऱ्यांवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. बाबर पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर झाल्मी या संघाचा कर्णधार आहे.

News Title- Legends Cricket Trophy 2024 will feature Pakistani players including Babar Azam led by New York Superstar Strikers captain Yuvraj Singh

महत्त्वाच्या बातम्या –

“तुमच्यासारखी लोक इतिहास बदलतात कारण…”, शिल्पा शेट्टीने मोदींचे मानले आभार

भारत ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वात 2024 चा वर्ल्ड कप जिंकेलच; जय शाह यांचं मोठं विधान

‘या’ बड्या नेत्याचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला, म्हणाले…

“रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय योग्यच”, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?, पुण्यातील मोदी बागेत बैठक सुरू