जरांगेच्या आंदोलनाचा सहावा दिवस; प्रकृती खालावली, मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 10 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज गुरूवारी या आंदोलनाचा सहावा दिवस असून जरांगेची प्रकृती खालावली आहे. अनेकदा विनवणी केल्यानंतर त्यांनी उपचार घेण्यास होकार दिला आणि सहकार्य केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणावर असलेले मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. उपोषणादरम्यान मृत्यू झाला तर हनुमानाने लंका पेटवली त्याप्रमाणे मराठा समाजाचे लोक महाराष्ट्रात पेटवून देतील, असे त्यांनी म्हटले.

राज्य सरकारने ठोस पावले टाकत जरांगेची एक मागणी मान्य केल्याचे दिसते. कारण 20 तारखेला मंगळवारी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर अखेर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाला. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही जाहीर सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिला होता. त्यावरून चांगलेच राजकारण तापले.

मराठा आरक्षणासाठी अधिवेशन

मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या मूळ गावी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. गुरूवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. जरांगेंनी पाणी देखील न पिल्याने त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. बुधवारी त्यांच्या नाकातून रक्त आले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावले आहे.

कुणबी मराठा समाजाच्या नोंदींसंदर्भातील मसुदा अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून सरकारने राज्यपाल रमेश बैस यांना मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाची विशेष बैठक बोलावण्याची शिफारस केली.

Manoj Jarange Patil यांचे आंदोलन

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे.

दरम्यान, विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील मागणी करत असलेल्या कुणबी नोंदी यावर चर्चा होणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. तसेच सगेसोयरे यासंदर्भातील अधिसूचनेला देखील अधिवेशनात कायद्याचे स्वरूप येण्याची शक्यता आहे.

News Title- Following the demand of Manoj Jarange Patil, the state government has called a special session for Maratha reservation on Tuesday
महत्त्वाच्या बातम्या –

युवराज सिंगच्या नेतृत्वात खेळणार पाकिस्तानचे खेळाडू; बाबर आझमसह अनेकांचा सहभाग

“तुमच्यासारखी लोक इतिहास बदलतात कारण…”, शिल्पा शेट्टीने मोदींचे मानले आभार

भारत ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वात 2024 चा वर्ल्ड कप जिंकेलच; जय शाह यांचं मोठं विधान

‘या’ बड्या नेत्याचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला, म्हणाले…

“रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय योग्यच”, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य