Nitish Kumar | नितीश कुमार यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाले आहे. मागील काही दिवसांपासून बिहार राजकारणातील नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत होते. राष्ट्रीय जनता दलासोबतचे सरकार पाडून नितीश यांनी पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. अशातच बिहारचे पोलीस महासंचालक आरएस भाटी यांना फोनवर धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपपासून दूर राहण्यास सांगितले आहे, अन्यथा बॉम्बने उडवून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह त्यांच्या आमदारांना मारून टाकू असे धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे. आरएस भाटी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. मात्र, बिहार पोलिसांनीही यावर तातडीने ॲक्शन घेतली आणि धमकी देणाऱ्याचा शोध घेतला.
मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी
याप्रकरणी तपासाअंती आर्थिक गुन्हे शाखेने कर्नाटकात छापे टाकून आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस बुधवारी रात्री उशिरा आरोपीसह पाटणा येथे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. 28 जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत त्यांचे जुने सहकारी एनडीएसोबत सरकार स्थापन केले.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 12 जानेवारी रोजी 243 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 ऐवजी 129 आमदारांचा पाठिंबा मिळवून त्यांच्या NDA सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र, नितीश कुमार हे इंडिया आघाडी सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
Nitish Kumar नवव्यांदा मुख्यमंत्री
नितीश कुमार यांनी भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. पण, भाजपसोबत ते गेल्यामुळे जेडीयू आणि भाजपमधील अनेक नेत्यांमध्ये असंतोष आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे नेते डॉ.संजीव, विमा भारती आणि दिलीप राय यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. याशिवाय इतर अनेक आमदारांनीही नितीश यांच्या एनडीएमध्ये जाण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता.
दरम्यान, नितीश कुमार यांनी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत रोखण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. ही आघाडी तयार करण्यात नितीश यांचा पुढाकार होता. मात्र, ऐनवेळी त्यांनीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेत इंडिया आघाडीला धक्का दिला.
News Title- Bihar Chief Minister Nitish Kumar was threatened to separate from the BJP or be blown up by bombs
महत्त्वाच्या बातम्या –
जरांगेच्या आंदोलनाचा सहावा दिवस; प्रकृती खालावली, मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन
युवराज सिंगच्या नेतृत्वात खेळणार पाकिस्तानचे खेळाडू; बाबर आझमसह अनेकांचा सहभाग
“तुमच्यासारखी लोक इतिहास बदलतात कारण…”, शिल्पा शेट्टीने मोदींचे मानले आभार
भारत ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वात 2024 चा वर्ल्ड कप जिंकेलच; जय शाह यांचं मोठं विधान
‘या’ बड्या नेत्याचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला, म्हणाले…