‘लेका’ला टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; मुंबईकर सर्फराजसाठी भावनिक क्षण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs ENG 3rd Test | आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात चार बदल करण्यात आल्याचे कर्णधाराने सांगितले. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल हे आजच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. त्याचबरोबर अक्षर आणि मुकेश कुमार यांना वगळण्यात आले आहे.

अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांचे पुनरागमन झाले आहे. जडेजा दुखापतीमुळे मागील अर्थात दुसऱ्या कसोटीत खेळला नव्हता. पाहुण्या इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा 100 वा कसोटी सामना आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना गुजरातमधील राजकोट येथे खेळवला जात आहे. मुंबईकर सर्फराज खानला टीम इंडियाची कॅप मिळताच त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.

 

सर्फराज खानचे पदार्पण

सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल भारताकडून या कसोटीत पदार्पण करत आहेत. दोघांचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण आहे. अनिल कुंबळेने पदार्पणाची कॅप सर्फराजला दिली. त्याचवेळी दिनेश कार्तिकने ध्रुवला पदार्पणाची कॅप दिली. सर्फराज हा 311 वा तर ध्रुव हा कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा 312 वा खेळाडू ठरला आहे. सर्फराजला जेव्हा पदार्पणाची कॅप दिली जात होती, तेव्हा त्याचे प्रशिक्षक आणि वडील नौशाद खानही तिथे उपस्थित होते. आपल्या मुलाला कॅप मिळाल्याचे पाहून त्यांना रडू कोसळले.

 

 

IND vs ENG 3rd Test आजपासून थरार

दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून पाहुण्या इंग्लंडने विजयी सलामी दिली होती. हा सामना हैदराबादमध्ये खेळवला गेला. पण, दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयाने भारतीय संघाला मालिकेत बरोबरी मिळवून दिली. आताच्या घडीला ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे.

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ –

बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, जेम्स अँडरसन, रेहान अहमद, मार्क वुड.

News Title- IND vs ENG 3rd Test match sarfaraz khan and dhruv jurel debut for team india, Naushad Khan gets emotional as his son gets India cap

महत्त्वाच्या बातम्या –

“भाजपपासून दूर राहा नाहीतर बॉम्बने उडवून टाकू”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

जरांगेच्या आंदोलनाचा सहावा दिवस; प्रकृती खालावली, मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन

युवराज सिंगच्या नेतृत्वात खेळणार पाकिस्तानचे खेळाडू; बाबर आझमसह अनेकांचा सहभाग

“तुमच्यासारखी लोक इतिहास बदलतात कारण…”, शिल्पा शेट्टीने मोदींचे मानले आभार

भारत ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वात 2024 चा वर्ल्ड कप जिंकेलच; जय शाह यांचं मोठं विधान