‘या’ खेळाडूने मोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

David Warner | टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एक चांगला फलंदाज आणि चांगला कर्णधार आहे. विश्वचकामध्ये त्याची अफलातून फलंदाजी आणि संघाचं केलेलं नेतृत्व आपण पाहिलं असेल. रोहित शर्मावर विश्वचषकामध्ये सर्वात अधिक षटकार लगावल्याचा विक्रम आहे. टी 20 सामन्यातही चांगला खेळ दाखवतो. मात्र आता त्याला ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर (David Warner) या फलंदाजानं रोहित शर्माला मागे टाकत रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेविड वॉर्नरने टी 20 वेस्टइंडिज सामन्याविरोधात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने टीम इंडियाचा फलंदाज रोहित शर्माला देखील मागे टाकलं आहे. यामुळे आता डेविड वॉर्नर (David Warner) चांगलाच फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय.

वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांची टी 20 मालिका पार पडली आहे. त्यातील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने चांगली फलंदाजी करत 220 धावा केल्या आणि 221 धावांचं लक्ष दिलं. मात्र ऑस्ट्रेलियानं केवळ 183 धावा केल्या आणि तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

डेविड वॉर्नरने तिसऱ्या टी 20 सामन्यात 49 चेंडूंचा सामना करत 81 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 9 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर रस्सलने डेविड वॉर्नरचा झेल घेतला आणि वॉर्नर बाद झाला. मात्र असं असलं तरीही वॉर्नरने एक मोठी कामगिरी केली आहे. केवळ 17 धावा करत टी 20 मध्ये 3000  धावा पूर्ण केल्या आहेत.

डेविड वॉर्नरने मोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड

रोहित शर्माने टी 20 मध्ये 3000 धावा केल्या आहेत. तर वॉर्नरनेही 3000 धावा केल्या आहेत. मात्र रोहित शर्माने 108 डावांमध्ये 3000 धावा केल्या आहेत. तर वॉर्नरने 102 डावांमध्ये 3020 धावा केल्या आहेत. रोहित शर्माहून कमी डावांमध्ये वॉर्नरने रोहित शर्माहून अधिक धावा करत रोहित शर्माला मागे टाकले आहे.

विराट कोहली 1 नंबर

टी 20 मध्ये टीम इंडियाचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली हा कमी डावांमध्ये 3000 धावा करणारा अव्वल फलंदाज आहे. त्याने 81 डावांमध्ये 3000 धावा केल्या आहेत.

News title – David warner record break of rohit sharma

महत्त्वाच्या बातम्या

“…म्हणून लोक तुमच्यावर थुंकत आहेत”, अशोक चव्हाणांवर संजय राऊत भडकले

भारतीय क्रिकेटवर शोककळा ! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचं निधन

‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर होईल लक्ष्मीची कृपा!

‘…म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला’; अशोक चव्हाणांनी स्वत:च सांगितलं कारण

भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया