शरद पवार यांच्या चिन्हांबाबत मोठी बातमी, ‘या’ चिन्हासाठी निवडणूक आयोगामध्ये प्रस्ताव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळजनक घटना घडल्या आहेत. ज्यांनी आपल्या पक्षाची स्थापना केली, त्यांच्याच हातून पक्ष निसटून गेलाय. ईडी आणि सीबीआयचा वापर करत भाजपने विरोधकांना आपल्या बाजूने वळवत फोडाफोडीचं राजकारण केलं असल्याचा विरोधकांचा दावा आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही उद्धव ठाकरे यांच्या हातून गेलं आणि आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची दखल न घेता निवडणूक आयोगाने खरा पक्ष हा अजित पवार यांचा आहे अशी सुनावणी केली.

शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता आता तोच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला आहे. यामुळे राज्याच्या राजकाणाचे चित्र विचित्र झालेलं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad pawar) गटाला आपल्या पक्षाच्या नावासाठी काही पर्याय दिले होते त्यापैकी एक नाव पक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

‘या’ तीन चिन्हांवर दावा

निवडणूक आयोगाने शरद पवार गटासाठी तीन नावे दिली होती. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार, तिसरं नाव आहे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदराव पवार अशा तीन नावांपैकी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. आता चिन्हांवरून मोठी अपडेट समोर आली आहे.

शरद पवार गटाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता शरद पवार गटाचे चिन्ह कोणतं असणार? असा मतदारांना सवाल आहे. यासाठी शरद पवार गटातील काही नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचा प्रस्ताव मांडला आहे. कपबशी, शिट्टी आणि वटवृक्ष अशा तीन चिन्हांचा शरद पवार गटाकडून प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

निवडणूक आयोगाने अद्यापही कोणत्याही चिन्हाबाबत अपडेट दिली नाही. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग कधी देणार हे पाहणं उत्कंठावर्धक आहे. यावर अधिकृत माहिती अजून समोर आली नाही. मात्र टीव्ही 9 माध्यमाच्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती शरद पवार गटाच्या नेत्यानं सांगितली होती. यावर रोहित पवार यांनी याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं आहे.

News Title – Sharad Pawar symbols Election commission news update

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ बड्या नेत्याचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला, म्हणाले…

“रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय योग्यच”, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?, पुण्यातील मोदी बागेत बैठक सुरू

भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी हटवली, देशाच्या तिरंग्याखाली खेळण्यासाठी खेळाडूंचा मार्ग मोकळा

‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; डबल फायदा