Sania Mirza | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने तिसऱ्यांदा लग्न केलं. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिल्याचं म्हटलं गेलं. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नाचा संसार थाटला. यानंतर भारतासह पाकिस्तानमधूनही शोएबवर टीका केली गेली.
घटस्फोटानंतर सानिया अनेकदा भावूक पोस्ट करताना दिसली. कधी आपल्या मुलांसोबत तर कधी एकटेपणाची जाण देणारी पोस्ट तिने केली. आता नुकतीच तिची एक नवीन पोस्ट चर्चेत आली आहे. यात तिने शोएबचं नाव न घेता आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत
सानिया मिर्झाने (Sania Mirza) शेअर केलेल्या पोस्टचा ‘व्हॉट इज सब्र’ असा मथळा असून यासंपूर्ण पोस्टमध्ये सानिया हिने शोएब मलिक याचं नाव घेतलं नाही. मात्र यातून तिने शोएबला माफ केल्याचं दिसतं. या संदर्भात सानियाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
जेव्हा तुमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असेल, परंतु बाहेरच्या जगात तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल. डोळ्यातून अश्रू येतील, परंतु ते पाहण्यापूर्वी ते पुसून घेतले असणार. ज्याने तुमच्यासोबत चुकीचा व्यवहार केला, त्याला माफ करणेही ‘सब्र’ आहे. अल्लाहवर विश्वास ठेवावा, जे होईल ते सर्व ठीक होईल. अल्लाहच्या प्लॅनवर विश्वास ठेवणेही सब्र आहे, अशा आशयाची पोस्ट सानियाने केली आहे.
शोएब मलिक नेटकऱ्यांकडून टार्गेट
सानियाच्या (Sania Mirza) या पोस्टनंतर चाहतेही आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. चाहत्यांकडून अजूनही शोएबला सोशल मिडियावर टार्गेट केलं जातं. त्याच्यामुळे पाकिस्तानी मुलांच्या मानसिकतेवरही प्रश्न केले गेले. पाकिस्तानमधीलच एका प्रसिद्ध अभिनेत्रीनेही त्याच्यावर प्रचंड टीका केली होती.
शोएब मलिकने (Shoaib Malik) सना जावेद या प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत तिसरं लग्न केलं. सना जावेदने 2012 मध्ये ‘शेहर-ए-जात’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. यासोबतच तीने अनेक मालिकांमध्येही भूमिका केली. एका शूटदरम्यान त्यांची भेट झाली. नंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. त्यामुळे सना आणि शोएब अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पुढे शोएबने सानियाशी वेगळं होत तिसरा संसार थाटला.
News Title- Sania Mirza emotional post
महत्त्वाच्या बातम्या –
जरांगेच्या आंदोलनाचा सहावा दिवस; प्रकृती खालावली, मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन
युवराज सिंगच्या नेतृत्वात खेळणार पाकिस्तानचे खेळाडू; बाबर आझमसह अनेकांचा सहभाग
“तुमच्यासारखी लोक इतिहास बदलतात कारण…”, शिल्पा शेट्टीने मोदींचे मानले आभार
भारत ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वात 2024 चा वर्ल्ड कप जिंकेलच; जय शाह यांचं मोठं विधान