मोठी बातमी! गणपत गायकवाड प्रकरणी महत्त्वाची बातमी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ganpat Gaikwad | गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) हे प्रकरण नवीन वळण घेताना दिसत आहे. गणपत गायकवाड यांना तळोजा कारागृहामध्ये रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कारण गेली काही दिवस त्यांना ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली होती. मात्र आता त्यांना गोळीबार प्रकरणामध्ये तळोजा कारागृहात रवाना करण्यात आलं आहे.

जमीनीच्या वादातून ही घटना घडली आहे. जमीनीच्या मांडवलीवरून वादाला तोंड फुटलं असून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यातच तब्बल 6 गोळ्या झाडल्या. याप्रकरणी महेश गायकवाड (Ganpat Gaikwad) जबर जखमी झाले त्यांना ठाण्यातील ज्युपीटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

याप्रकरणी गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत त्यांचे काही साथीदार हर्षल केणे, विकी गणत्रा, संदीप सरवणकर यांना अटक करण्यात आली. तसेच काही दिवसांआधी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गणपत गायकवाड यांची 11 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सर्व आरोपींना चोपडा न्यायालयात आणण्यात आलं आहे.

 न्यायालयात युक्तिवाद 

दोन्ही बाजूच्या वकिलांनी नवीन मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. सरकारी वकिलांनी गणपत गायकवाड यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच त्यानंतर गणपत गायकवाड यांच्या वकिलांनी कोणतेही नवीन मुद्दे उपस्थित न केल्याचा युक्तिवाद केला आहे. यावेळी न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह इतर साथीदारांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्यांना तळोजा कारागृहात रवाना करण्यात आलं.

उल्हासनगरमध्ये सुनावणी वेळी संचारबंदी

सुरक्षिततेच्या कारणाने सकाळी 9 वाजता सुनावणी घेण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात गणपत गायकवाड यांच्यासह सर्व आरोपींना चोपडा न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणी वेळी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी संचारबंदी लागू केली.

गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ

गणपत गायकवाड यांना तळोजा कारागृहामध्ये रवाना करण्यात आलं असून काही दिवसांआधी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड याला देखील अटक करण्यात आलं होतं. सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला त्यामध्ये वैभव गायकवाड दिसल्याने याप्रकरणात त्यालाही दोषी ठरवण्यात आलं. तसेच द्वारली गावामध्ये एकनाथ जाधव नामक शेतकऱ्याला जातीवाचक वक्तव्य केल्यानं त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

News Title – Ganpat Gaikwad arrested taloje Jail

महत्त्वाच्या बातम्या

‘लेका’ला टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; मुंबईकर सर्फराजसाठी भावनिक क्षण

“भाजपपासून दूर राहा नाहीतर बॉम्बने उडवून टाकू”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

जरांगेच्या आंदोलनाचा सहावा दिवस; प्रकृती खालावली, मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन

युवराज सिंगच्या नेतृत्वात खेळणार पाकिस्तानचे खेळाडू; बाबर आझमसह अनेकांचा सहभाग

“तुमच्यासारखी लोक इतिहास बदलतात कारण…”, शिल्पा शेट्टीने मोदींचे मानले आभार