शेतकरी आंदोलन चिघळलं, 40 आंदोलक जखमी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Farmers Protest | साधारण वर्षाभरापूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. तेव्हा मोदी सरकारने शेतकऱ्यांची मागणी ऐकत कृषी कायदे रद्द केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनासाठी (Farmers Protest ) उतरले आहेत. एमएसपीबाबत कायदा करण्याच्या मागणीसाठी ते पुन्हा आंदोलन करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे.

हे आंदोलन आता हिंसक वळण घेत आहे. शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी बुधवारी चक्क रबरी गोळ्यांचा मारा केला. यामध्ये 40 हून अधिक शेतकरी जखमी झाले आहेत. पोलिसांनी ड्रोनद्वारे अश्रुधुराची नळकांडीही फोडली. या घटनेमुळे आता विरोधक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

आंदोलनावर आज तोडगा निघणार?

केंद्र सरकारने या आंदोलनाविरोधात (Farmers Protest ) कठोर भूमिका घेतली आहे. यामुळेच शेतकरी नेत्यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे. केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे मंत्री पथक आज (15 फेब्रुवारी) शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

शेतकरी सध्या पंजाब-हरियाणा शंभू सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. केंद्र सरकार जर मोकळे मनाने चर्चा करणार असेल तर चर्चा चालू ठेवली पाहिजे, असा निर्णय आंदोलकांनी घेतल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे (एकता सिंधूपूर) अध्यक्ष जगदीश सिंग दल्लेवाल यांनी दिली आहे. त्यामुळे आजच्या चर्चेत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

‘या’ तारखेला भारत बंदची हाक

वर्षभरापूर्वी शेतकऱ्यांनी (Farmers Protest ) दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन केलं होतं, यामुळे मोदी सरकारला नमती भूमिका घेत नवीन कृषी कायदे रद्द करावे लागले होते. त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर पोहोचण्यापासून रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे .तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी 16 फेब्रुवारीला ग्रामीण भारत बंदची हाकही दिली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय?

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार एमएसपीवर (Farmers Protest) तात्काळ कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कायदा बनवण्याची प्रक्रिया इतक्या लवकर पूर्ण होऊ शकत नाही, असं सरकारने म्हटलं आहे. मात्र आज होणाऱ्या चर्चेत यावर तोडगा निघू शकतो.

News Title- Farmers Protest 40 protesters injured by rubber bullets

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! माजी मंत्र्यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, राजीनामा दिला, कारणही सांगितलं

‘लेका’ला टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; मुंबईकर सर्फराजसाठी भावनिक क्षण

“भाजपपासून दूर राहा नाहीतर बॉम्बने उडवून टाकू”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

जरांगेच्या आंदोलनाचा सहावा दिवस; प्रकृती खालावली, मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन

युवराज सिंगच्या नेतृत्वात खेळणार पाकिस्तानचे खेळाडू; बाबर आझमसह अनेकांचा सहभाग