‘किंग खान’ च्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shahrukh Khan | ‘किंग खान’ अर्थातच अभिनेता शाहरुख खानचे (Shahrukh Khan) चाहते जगभरात आहेत. त्याच्या एका अदावर चाहते आजही फिदा होतात. नुकतीच त्याने वर्ल्ड गवर्नमेंट समिटमध्ये हजेरी लावली होती. दुबई येथे हा ग्लोबल इवेंट होत आहे. याच कार्यक्रमात शाहरुखला एक प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

कार्यक्रमातील होस्टने शाहरुखला विचारलं की त्याला हॉलिवूडच्या लोकप्रिय स्पाय हिरो ‘जेम्स बाँड’ची भूमिका करायला आवडेल का?, या प्रश्नाला शाहरुखने दिलेल्या उत्तराने सर्वांचंच मन जिंकलं. तसेच सर्वांमध्ये हास्यही फुललं.

“मी लिजेंड नाही…मी बाँड आहे, जेम्स बाँड”

या शिखर परिषदेत एका खास संभाषणाचा भाग बनलेल्या शाहरुखची ओळख करून देताना हॉस्टने त्याला ‘लिजेंड’ म्हटलं. पण शाहरुखने (Shahrukh Khan) अतिशय गमतीशीरपणे सांगितलं की, ‘तू खूप गोड आहेस, पण मी लिजेंड नाही… मी बाँड आहे. जेम्स बाँड.’ त्याच्या या उत्तराने सर्वांमध्येच हसू फुटलं.

पुढे तो म्हणाला की, ‘मला बाँड व्हायचं आहे, पण त्यासाठी मी खूप लहान आहे.’ त्याचं हे उत्तर ऐकून कार्यक्रमाला उपस्थित लोक खूप हसले. पण यानंतर शाहरुखला जेव्हा विचारण्यात आलं की, बाँड चित्रपटात विलेन बनण्याबद्दल तुला काय वाटलं? तर यावर शाहरुख म्हणाला, ‘हो, ही भूमिका मी करू शकतो.’ त्यामुळे लवकरच शाहरुख हॉलीवूडमध्ये एंट्री करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. चाहते आतापासूनच वेगवेगळे अंदाज बांधत आहेत.

‘अनेकदा असं होतं की तुम्ही एक चांगला चित्रपट बनवला आहे, तुम्ही सर्वोत्तम कथा बनवत आहात, तुम्हाला वाटतं की संपूर्ण जगाला तो आवडेल. मात्र जेव्हा तुम्ही सकाळी उठून बघता तर तेव्हा तो चित्रपट सपशेल फ्लॉप झालेला असतो. तर कधी कधी असेही होते तुम्हाला एखादा चित्रपट बिलकुल आवडत नाही, पण तो हीट होतो. त्यामुळे मी करत असलेल्या प्रत्येक कामाचे मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतो’, असं पुढे शाहरुख म्हणाला.

“मला कधीच लव्हर बॉय बनायचं नव्हतं”

शाहरुख (Shahrukh Khan) पुढे आपल्या अभिनयाबद्दलही बोलला. “मला कधीही ‘लव्हर बॉय’ बनायचे नव्हते. मला कधीही ‘सपनों का सौदागर’ किंवा प्रेम वाटणारा बनायचं नव्हतं. मला कायमच एक अॅक्शन हीरो बनायचं होतं. मात्र, लोकांना माझा हा प्रेमळ रोलच अधिक आवडतो. मला माझ्या चित्रपटातून लोकांना नवीन आशा, धाडस द्यायचं आहे.”

News Title-  Shahrukh Khan said I am James Bond

महत्त्वाच्या बातम्या –

“भाजपपासून दूर राहा नाहीतर बॉम्बने उडवून टाकू”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

जरांगेच्या आंदोलनाचा सहावा दिवस; प्रकृती खालावली, मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन

युवराज सिंगच्या नेतृत्वात खेळणार पाकिस्तानचे खेळाडू; बाबर आझमसह अनेकांचा सहभाग

“तुमच्यासारखी लोक इतिहास बदलतात कारण…”, शिल्पा शेट्टीने मोदींचे मानले आभार

भारत ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वात 2024 चा वर्ल्ड कप जिंकेलच; जय शाह यांचं मोठं विधान