अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अडकणार लग्नबंधनात!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rakul Preet Singh | साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिने अभिनेता अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये एंट्री केली होती. साऊथमध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुन तसेच इतर अभिनेत्यांसोबतही तिने अनेक हीट चित्रपट दिले आहेत.

रकुल प्रीत सिंह ही बऱ्याच दिवसांपासून अभिनेता जॅकी भगनानी सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. आता दोघांनीही आपल्या चाहत्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही गोव्याच्या आलिशान रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहेत.

‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात

येत्या 21 फेब्रुवारी रोजी हे दोघं (Rakul Preet Singh) गोव्यातील आलिशान हॉटेलमध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. साऊथ गोव्यातील आयटीसी ग्रँडमध्ये त्यांचा विवाह सोहळा होणार आहे. हा सोहळा अगदी कमी लोकांमध्ये होणार आहे.

विवाहाला फक्त दोघांचे घरचे आणि जवळचे काही मित्र मंडळी उपस्थित राहणार आहेत. आयटीसी ग्रँड हे 246 रुम्सचे आलिशान हॉटेल आहे. ‘मेक माय ट्रिप’नुसार गोव्यातील या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये एका रुमची किंमत 19 हजार रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे रकुलच्या लग्नाची चांगलीच चर्चा होत आहे. एवढ्या आलिशान हॉटेलमध्ये लग्न म्हटलं तर तिथे सजावट पासून जेवण सगळं काही आलिशान असणार, अशा चर्चा आता होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

2021 मध्ये प्रेमाची जाहीर कबुली

अभिनेत्री रकुल प्रीत (Rakul Preet Singh) आणि जॅकी दोघेही बऱ्याच दिवसांपासून नात्यात आहेत. त्यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून या दोघांना विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. आपल्या नात्याबाबत रकुलने अनेक खुलासेही केले होते.

रकुलने लॉकडाऊनदरम्यान एकमेकांशी जवळीक वाढल्याचं सांगितलं होतं. “आमची मैत्री आणि नातं अत्यंत सहजपणे सुरु झालं होतं. आम्ही मित्र म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवत होते आणि तीन-चार महिन्यांतच आम्हाला एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली.”, असं रकुलने सांगितलं होतं. आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहतेही आनंदित आहेत.

News Title –  Rakul Preet Singh and Jackie Bhagnani to get married

महत्वाच्या बातम्या-  

मनोज जरांगे पाटील यांनी तोडली सलाईन, म्हणाले…

उर्फी जावेदचा ‘वेलेंटाईन डे’ लूक तूफान व्हायरल, सोशल मीडियावर ट्रोल

मोठी बातमी! माजी मंत्र्यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, राजीनामा दिला, कारणही सांगितलं

‘लेका’ला टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; मुंबईकर सर्फराजसाठी भावनिक क्षण

“भाजपपासून दूर राहा नाहीतर बॉम्बने उडवून टाकू”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी