कसोटी पदार्पणात लेकाची अर्धशतकी खेळी अन् बापाच्या डोळ्यात पाणी!

Eng vs Ind | इंग्लंड विरूद्ध इंडिया (Eng Vs Ind Test) तिसऱ्या कसोटी सामन्याची सुरूवात झाली आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी सरफराज खानने आपल्या कसोटी सामन्याच्या पदार्पणामध्ये अर्थशतकीय खेळी केली आहे. कसोटी सामन्यामध्ये त्याने अफलातून अर्धशतकीय खेळी केली आहे. वनडे स्टाईलने सरफराजने आपल्या फलंदाजीचं दर्शन हे देशालाच नाहीतर जगाला दाखवलं आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम नाणेफेकी जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीचा निर्णय घेत त्याने आज चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीला 33 धावांवर टीम इंडियाचे 3 गडी बाद झाले होते त्यावेळी त्याने चांगली कामगिरी करत 196 चेंडूंचा सामना करत 131 धावा केल्या आहेत. त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावत चांगली फलंदाजी केली. यावेळी मार्क वूडने त्याला झेलबाद केलं. रोहित शर्माच्या फलंदाजीनंतर कसोटीत पदार्पण केलेला फलंदाज सरफराजने मैदानावर आग ओकत फलंदाजी केली आहे.

सरफराजने रोहित शर्मा बाद झाल्यानंतर परिस्थिती जाणून घेत चांगली कामगिरी केली. कसोटी सामन्यामध्ये त्याने वनडे फॉर्मप्रमाणे फलंदाजी करत खेळ दाखवला आहे. त्याने 48 चेंडूंमध्ये 1 षटकार आणि 7 चौकार लगावले असून अर्धशतकी खेळी केली आहे. अनेकांच्या नजरा सरफराजकडे होत्या. मात्र त्यानंतर सरफराजला जडेजानं धावबाद केलं.

बापाच्या डोळ्यात पाणी

सरफराजचा कसोटीतील आजचा पहिलाच सामना होता. यामुळे सरफराजवर थोडंफार दडपण हे असणारच. कारण सुरूवातीला फलंदाज बाद होऊन तंबूत परतले होते. त्यानंतर रोहित शर्मा आणि जडेजाने केलेली कामगिरी अफलातून होती. मात्र रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर सरफराजला खेळण्यासाठी संधी मिळाली आणि त्याने वनडे पद्धतीत आपला खेळ कसोटीमध्ये दाखवला. ज्यावेळी सरफराजचं अर्धशतक झालं त्यावेळी जडेजाच्या जेमतेम 8 -10 धावा झाल्या होत्या. मात्र सरफराजने तोवर अर्धशतक केलं. ते पाहून सरफराजच्या वडिलांना अश्रू आनावर झाले होते.

रोहित शर्माने प्रथम नाणेफेकी जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर काही फलंदाजांनी साथ दिली नाही ते बाद होऊन तंबूत परतले. पाटीदार, गिल आणि यशस्वी हे फलंदाज बाद होऊन तंबूत परतले आहेत. यामध्ये यशस्वीने मागील कसोटी पदर्पणात शतक ठोकलं मात्र तिसऱ्या सामन्यात तो चमकू शकला नाही.

टीम इंडिया – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

News Title – ind vs Eng test sarfaraz father crying

महत्त्वाच्या बातम्या

जया अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!

चांगल्या बायकोत असतात ‘या’ 3 गोष्टी, नवरा कायम राहतो खूश!

मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

डायबेटिस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकरांचा ऐतिहासिक निर्णय, शरद पवारांना धक्का