चांगल्या बायकोत असतात ‘या’ 3 गोष्टी, नवरा कायम राहतो खूश!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | संसाराचा गाडा हा नवरा आणि बायको हाकत असतात. हा संसाराचा गाडा शेवटपर्यंत हाकण्यासाठी संसाराची दोन चाकं म्हणजे नवरा आणि बायको आहेत. दोघांना एकमेकांकडून काही न काही अपेक्षा असतात. ज्याप्रकारे बायकोला नवऱ्याकडून अपेक्षा असते तशीच नवऱ्याला बायकोकडून अपेक्षा असते. संसारामध्ये बायको जर शांत आणि सोज्वळ असेल तर नवऱ्या मुलाच्या आयुष्याची चांदी होताना पाहायला मिळते.

नवरा आणि बायको यांच्या नात्यामध्ये चांगला समज असेल तर दोघेही आलेल्या संकटांचा सामना करू शकतात. आचार्य चाणक्य यांनी एक चांगल्या महिलेचं, पत्नीचं लक्षण असलेल्या तीन चांगल्या सवयी सांगितल्या आहेत. त्या तीन लक्षणांवरून ती आपल्या पतीला सदैव खुश ठेवू शकते.

बचत करणारी बायको

चाणक्यनीतीनूसार बचत हा महत्वाचा मुद्दा आहे. जर बायको पैशांची बचत करत असेल तर हे लक्षण नवऱ्यासाठी फार महत्त्वाचं आणि फायदेशीर आहे. बायकोमध्ये (महिलेमध्ये) जर बचत करण्याचा गुण असेल तर आर्थिकदृष्ट्या नवऱ्यालचा फायदा असून पत्नीकडून चांगली मदत होऊ शकते. पडत्या काळामध्ये कुटुंबाला बचत केलेल्या पैशांचा योग्य पद्धतीनं वापर करता येईल.

मृदु भाषिक बायको

मृदु भाषिक आणि सदैव तिच्या भाषेत गोडवा असेल तर तिचा पती नशीबवान म्हणावा लागेल. अनेकदा पुरूषांच्या तुलनेत बायका या फटकळ आणि वचवच करणाऱ्या असतात. त्यांच्या तोंडावर कशाचाही ताबा नसतो. यामुळे अनेकदा नवऱ्याची चिडचिड होते. मात्र यामुळे नवरा कधीही खुश राहत नाही. यासाठी एखादी पत्नी मृदू भाषिक असेल आणि तिच्या तोंडात साखरेसारखा गोडवा असेल तर कुटुंबामध्ये वाद जास्त होत नाहीत यामुळे तिचा पती नेहमी खुश राहू शकतो.

धर्मावर आणि कर्मावर विश्वास असणारी बायको

आचार्य चाणक्य यांच्या मते पत्नी ही देव पूजा करणारी असावी. तिला आध्यात्माची गोडी असावी. देव-धर्मांवर त्या महिलेचा विश्वास असावा. यामुळे तिच्या पुण्याईने आपल्या कुटुंबावर येणारे संकट दूर होऊ शकते. यामुळे तिनं पठणही करावं.

ज्यापद्धतीने पुरूषांना खुश ठेवण्यासाठी महिलांमध्ये काही गुण असणं आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे महिलांना खुश ठेवण्यांसाठी पुरूषांध्येही काही लक्षणं असावीत ज्यामुळे पत्नी खुश राहू शकते. पती हा नेहमी शांत आणि आपल्या पत्नीचं कौतुक करणारा असावा. तसेच तो आपल्या पत्नीचं संरक्षण करणारा असावा जेणेकरून आपल्या पत्नीला सुरक्षित वाटेल.

पुणे लोकसभेसाठी भाजपची मोठी चाल 

News Title – Chanakya Niti Good Quality in Wife

महत्त्वाच्या बातम्या

डायबेटिस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकरांचा ऐतिहासिक निर्णय, शरद पवारांना धक्का

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

“पापापा म्हणत पाटील पडले आता काका का म्हणत…”; काका-पुतण्यामध्ये चांगलंच वाजलं

पुणे हादरलं! लॉजवर मुलीसोबत घडला भयंकर प्रकार