केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांचा महागाई भत्ता आता 4 टक्क्यांनी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) लवकरच आणखी एक वाढ करण्यात येणार आहे.

जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात केंद्र सरकार सुधारणा करत असतं. त्यात मुख्यत: मार्चमध्ये डीए वाढीची घोषणा करण्यात येते. त्यामुळे येणाऱ्या महिन्यात केंद्र सरकार लवकरच डीए वाढवण्याची घोषणा करू शकते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार

ज्याला दरमहा 53,500 रुपये मूळ वेतन मिळते (DA Hike) आणि 46% नुसार त्याचा महागाई भत्ता 24,610 रुपये होता. तर आता त्याला 26,750 रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच यात 4 टक्के वाढ झाल्यानंतर याची किंमत वाढेल.

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी एक सूत्र वापरले जाते. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे पगार मिळवणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांनाच हे सूत्र लागू होईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 46% महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DR) मिळते. केंद्र सरकारने जाहीर केलेली शेवटची DA वाढ 18 ऑक्टोबर 2023 रोजी होती. त्यामुळे, आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DA आणि DR मध्ये 4% वाढ होण्याची शक्यता आहे.

पेन्शनधारकाच्या वेतनात किती वाढ होईल?

आता पेन्शनधारकाला (DA Hike) याने किती पैसे मिळणार याचा हिशोब इथे लावूया. समजा पेन्शनधारकाला दरमहा 41,100 रुपये पेन्शन मिळते असे गृहीत धरू. 46% DR वर पेन्शनधारकास 18,906 रुपये मिळतात. जर त्यांच्या डीआरमध्ये 50% वाढ झाली, तर त्यांना महागाई सवलत म्हणून दरमहा 20,550 रुपये मिळतील. म्हणजेच, जर लवकरच डीएमध्ये 4% वाढ झाली, तर त्याचे पेन्शन दरमहा 1,644 रुपयांनी वाढेल.

पुणे लोकसभेसाठी भाजपची मोठी चाल 

News Title – DA Hike will increase by 4 percent

महत्त्वाच्या बातम्या-

सोनिया गांधी यांनी केली सर्वांत मोठी घोषणा, म्हणाल्या..

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती चिंताजनक; महिलांचा आक्रोश सुरू

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अडकणार लग्नबंधनात!

‘किंग खान’ च्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

शेतकरी आंदोलन चिघळलं, 40 आंदोलक जखमी