सोनिया गांधी यांनी केली सर्वांत मोठी घोषणा, म्हणाल्या..

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sonia Gandhi | काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी काल (14 फेब्रुवारी) राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज केला आहे. त्या सध्या उत्तर प्रदेशमधील रायबरेली लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत.

यामुळे सोनिया गांधी यांनी रायबरेलीला भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी रायबरेलीला आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिल्लीमध्ये माझा परिवार अपूर्ण आहे, इथे रायबरेलीमध्ये माझा परिवार पूर्ण होतो, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी पुढे लोकसभा निवडणूक लढणार का, याबाबतही खुलासा केला आहे.

सोनिया गांधी यांचं पत्र

आमच्या (Sonia Gandhi) कुटुंबाच्या रायबरेलीशी असलेल्या नात्याची मुळे खूप खोलवर आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही इथून जिंकून माझे सासरे फिरोज गांधी यांना दिल्लीला पाठवले. त्यांच्यानंतर तुम्ही माझ्या सासूबाईंना आपले बनवले. तेव्हापासून आतापर्यंत ही मालिका सुरूच आहे. जीवनातील चढ-उतार आणि संकटातून पुढे चालत आपण इथ पर्यंत प्रवास केला.

विश्वासाच्या या उज्वल वाटेवर चालण्यासाठी तुम्ही मला प्रेरणा दिली. माझी सासू आणि माझे पती यांना कायमचं गमावल्यानंतर मी तुमच्याकडे आले. तुम्ही मला आपलंसं केलं. मला प्रेम दिलं. गेल्या दोन निवडणुकांमध्येही तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिलात. मी ते कधीच विसरणार नाही. मला सांगायला अभिमान वाटतो की आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे. तुमच्या विश्वासाला कायम ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेल, असं भावूक पत्र सोनिया गांधी यांनी लिहिलं आहे.

“मी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही”

पुढे आपल्या प्रकृतीचा आणि वाढत्या वयाचा संदर्भ देत सोनिया गांधी यांनी लिहिलं की, “माझी प्रकृती आणि वाढत्या वयामुळे मी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही. या निर्णयानंतर मला थेट तुमची सेवा करण्याची संधी मिळणार नाही, पण हे निश्चित आहे. माझे मन-प्राण सदैव तुमच्या सोबत असेल.

माझ्या परिवाराला तुम्ही आजपर्यंत खूप प्रेम दिलं आहे, पुढेही द्याल. तुम्ही कायम माझ्या कुटुंबामागे उभे राहाल ही माझी खात्री आहे. लवकरच भेटू, असं पत्र सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी रायबरेलीला लिहिलं आहे.

News Title –  Sonia Gandhi emotional letter to Raebareli

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवार यांच्या चिन्हांबाबत मोठी बातमी, ‘या’ चिन्हासाठी निवडणूक आयोगामध्ये प्रस्ताव

मनोज जरांगे पाटील यांनी तोडली सलाईन, म्हणाले…

उर्फी जावेदचा ‘वेलेंटाईन डे’ लूक तूफान व्हायरल, सोशल मीडियावर ट्रोल

मोठी बातमी! माजी मंत्र्यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, राजीनामा दिला, कारणही सांगितलं

‘लेका’ला टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; मुंबईकर सर्फराजसाठी भावनिक क्षण