मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांचा शिंदे सरकारला गंभीर इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

ST Employees Strike | राज्यात सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती सतत खालावत असल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे. याचे पडसाद काही भागांत दिसून आले आहेत. काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. आता शिंदे सरकारची अजूनच डोकेदुखी वाढणार आहे. कारण राज्यातील एसटी (ST Employees Strike) कर्मचाऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला चांगलाच ताप होणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून एसटीचे कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. यावर काहीच भूमिका घेत नसल्याने त्यांनी शिंदे सरकारला गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात आता एसटी कर्मचारी चर्चेत आले आहेत.

ST कर्मचाऱ्यांचा गंभीर इशारा

सप्टेंबर 2023 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees Strike) सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. आता चार महीने होत आलेत, मात्र त्यावर काहीच पाऊले न उचलल्याने एसटी कर्मचारी कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने लवकर भूमिका घेतली नाही तर परिणामी एसटी सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिले आहेत.

ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या कोणत्या?

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात यावा, घरभाडे भत्याची आणि वार्षिक वेतनवाढीच्या उर्वरित रक्कम देण्यात यावी अशी मागणी केली होती. सप्टेंबर 2023 मध्ये या मागण्या 15 दिवसात पूर्ण होणार, असं आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता 4 महिने उलटून गेले अद्याप बैठक झालेली नाही. यावरून एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

2023 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees Strike) सातवा वेतन आयोग लागू करणं, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकबाकी या मागण्यांवर चर्चा करून 60 दिवसांत अहवाल सरकारला सादर करण्याचं समितीने म्हटलं होतं. आता या गोष्टीला चार महिने उलटून गेले तरी अद्याप अहवाल सादर झालेला नाही. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने यासाठी आता उपोषण सुरू केलं आहे.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलना दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास एसटी सेवा बंद होणार, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे सध्या याचीच चर्चा होत आहे.

News Title – ST Employees strike warning in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवार यांच्या चिन्हांबाबत मोठी बातमी, ‘या’ चिन्हासाठी निवडणूक आयोगामध्ये प्रस्ताव

मनोज जरांगे पाटील यांनी तोडली सलाईन, म्हणाले…

उर्फी जावेदचा ‘वेलेंटाईन डे’ लूक तूफान व्हायरल, सोशल मीडियावर ट्रोल

मोठी बातमी! माजी मंत्र्यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, राजीनामा दिला, कारणही सांगितलं

‘लेका’ला टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; मुंबईकर सर्फराजसाठी भावनिक क्षण