दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CBSE Exam 2024 | 2024 च्या दहावी, बारावीच्या परीक्षा आता जवळ आल्या आहेत. तशी विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. यंदा केंद्रीय शिक्षण मंडळाने या परीक्षेसाठी (CBSE Exam 2024 ) काही महत्वाचे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांनी ते समजून घेणे आवश्यक आहेत. नवीन बदल समजून घेतले तर तुम्हाला ऐनवेळी अडचण येणार नाही.

दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षण मंडळाने परीक्षा संबंधी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE) परीक्षा येत्या 15 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये सीबीएसई (CBSE Exam 2024 ) बोर्डाने बदल केला आहे. आता हा बदल नेमका काय केलाय, याची माहिती तुम्हाला इथे दिली आहे.

परीक्षेच्या पॅटर्नमध्ये सीबीएसई बोर्डाने बदल केले आहेत. त्यानुसार ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्हमध्ये काही बदल झाले आहेत. या वर्षापासून सीबीएसईने बहुपर्यायी (MCQ) प्रश्नांची संख्या वाढवली आहे. तर डिस्क्रीपटीव्ह म्हणजेच वर्णनात्मक प्रश्नांची संख्या कमी करण्यात आली आहे.

नवीन पॅटर्न कसा असणार?

बोर्डाने केलेल्या नवीन नियमनुसार 10 वीच्या परीक्षेसाठी 50 टक्के प्रश्न योग्यता बेस्ड असतील. यासोबतच केस-बेस्ड आणि सोर्स बेस्ड इंटिग्रेटेड प्रश्न देखील विचारले जातील. यात 20% प्रश्न बहुपर्यायी आणि 30% शॉर्ट एंड लाँग असतील.

तर हाच नियम बारावीच्या परीक्षेसाठी (CBSE Exam 2024 ) वेगळा असणार आहे. बारावीसाठी पॅटर्नमध्ये 40% प्रश्न योग्यता बेस्ड असतील. यामध्ये 20% प्रश्न एमसीक्यू पद्धतीचे तर 40% शॉर्ट एंड लॉन्ग असतील. विद्यार्थ्यांनी ही माहिती काळजीपूर्वक जाणून घ्यावी, असं आवाहन बोर्डाने केलं आहे.

विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यास सुरुवात

बोर्डाने परीक्षेसाठी (CBSE Exam 2024 ) हॉल तिकीट जाहीर केले आहेत. शाळेत आणि कॉलेजमध्ये हॉल तिकीट वितरित केले जात आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापुर्वी हॉल तिकीट वरील माहिती नीट काळजी पूर्वक तपासून घ्यावी. यावर्षी बोर्ड कोणत्याही विद्यार्थ्याच्या गुणांची एकूण टक्केवारी मोजणार नाही.

News Title –  CBSE Exam 2024 Pattern

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवार यांच्या चिन्हांबाबत मोठी बातमी, ‘या’ चिन्हासाठी निवडणूक आयोगामध्ये प्रस्ताव

मनोज जरांगे पाटील यांनी तोडली सलाईन, म्हणाले…

उर्फी जावेदचा ‘वेलेंटाईन डे’ लूक तूफान व्हायरल, सोशल मीडियावर ट्रोल

मोठी बातमी! माजी मंत्र्यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, राजीनामा दिला, कारणही सांगितलं

‘लेका’ला टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; मुंबईकर सर्फराजसाठी भावनिक क्षण