“अशोक चव्हाण यांचं अभिनंदन करतो त्यांनी काँग्रेस पक्षावर दावा…”

Ashok chavan |  राज्यामध्ये पक्षफूटी सुरूच असून राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षफूटीनंतर आता काँग्रेसचा ही नंबर लागतोय का? असा सवाल उपस्थित होत असून आता अशोक चव्हाण यांनी देखील शिंदे आणि अजित पवारांप्रमाणे काँग्रेसवर दावा केला असता तरीही निकाल अशोक चव्हाण (Ashok chavan) यांच्या बाजूने लागला असता. यावेळी बोलत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. दिल्लीबाहेर जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे मोदीजी त्यांनाही गोळ्या घालतील, अशी खोटक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सध्या एकाबाजूला शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अन्न आणि पाणी त्याग केला आहे. तर तिसऱ्या बाजूला सरकार पक्ष फोडत नेते आपल्याबाजूने वळवत आहेत. आता याचप्रकरणावर संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. आधी भ्रष्टाचार करा मग पक्ष फोडा आणि आमच्याच पक्षावर दावा सांगा, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut | राऊतांचा अशोक चव्हाणांवर निशाणा

संजय राऊत म्हणाले की “आधी भ्रष्टाचार करा मग पक्ष फोडा आणि आमच्याच पक्षावर दावा सांगा. तुमचा जन्म त्या पक्षात झाला नसला तरीही त्या पक्षावर दावा करू शकतात. ही एकमेव मोदी गॅरंटी आहे. यामुळे अशोक चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो. कारण त्यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे दावा केला नाही. त्यांनी दावा सांगितला असता तर त्यांना चिन्ह मिळालं असतं आणि पक्षही मिळाला असता”.

“प्रफुल्ल पटेल यांचे काही वर्षे उरले आहेत मात्र तरीही ते निवडणुकीला उभे राहिले आहेत. या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं. प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते अपात्र होऊ नये यासाठी अजित पवार यांच्या गटामध्ये राज्यसभेची उमेदवारी दिली आहे”.

“अशोक चव्हाण यांनी चंद्रकांच हांडोरे यांना क्रॉस वोटींग केलं. एका दलित चेहऱ्याला मतदान करून त्यांना राज्यसेभेवर पाठवणं अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यासाठी त्यांना पाठिंबा दिला आहे. भाजपकडून निष्ठावंतांना उमेदवारी देण्यासाठी आम्ही अभिनंदन करतो”, असं राऊत म्हणाले आहेत.

शेतकरी आंदोलनावर भाष्य

शेतकरी आंदोलनावर संजय राऊत यांनी यावेळी भाष्य केलं आहे. दिल्लीबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. याकडे सरकार लक्ष देत नाही. असा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला होता. यावेळी संजय राऊत यांनी देखील नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांवर गोळ्या घालण्याच्या मनस्थितीत आहेत, अशी टीका करण्यात आली.

News Title – Ashok chavan against sanjay raut Statement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार यांच्या चिन्हांबाबत मोठी बातमी, ‘या’ चिन्हासाठी निवडणूक आयोगामध्ये प्रस्ताव

मनोज जरांगे पाटील यांनी तोडली सलाईन, म्हणाले…

उर्फी जावेदचा ‘वेलेंटाईन डे’ लूक तूफान व्हायरल, सोशल मीडियावर ट्रोल

मोठी बातमी! माजी मंत्र्यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, राजीनामा दिला, कारणही सांगितलं

‘लेका’ला टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; मुंबईकर सर्फराजसाठी भावनिक क्षण