Rohit Pawar vs Ajit Pawar | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. तेव्हापासून दोन्ही गटातून जोरदार टीका होताना दिसत आहे. राज्याच्या राजकारणामध्ये काका-पुतण्यांमध्ये अनेकदा घमासान पाहायला मिळालं आहे. आधी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये आरोपप्रत्यारोप पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता अजित पवार आणि रोहित पवार (Rohit Pawar vs Ajit Pawar) या काका-पुतण्यामध्ये चांगलंच वाजलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वक्तव्यासाठी चांगलेच चर्चेत असतात. त्यांनी आता आपले काका शरद पवार यांना देखील सोडलं नाही. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीका करायला सुरूवात केली आहे. मात्र यावेळी अजित पवार यांच्या पुतण्यानं रोहित पवार (Rohit Pawar vs Ajit Pawar) यांना का? का? असा प्रश्न उपस्थित केला असून ट्वीट करत अजित पवार यांच्यावर मिश्कील टीका केली आहे
रोहित पवार यांचं ट्वीट
“मा. अजित काका तुमचा हा जुना व्हिडीओ बघितला तर आज तुमच्यात झालेला बदल हा समजण्यापलिकडचा आहे. जे कधीही जमलं नाही ते भाजप फोडाफोडी करून आपल्याच लोकांकडून करून घेतंय, हे दुर्दैव! आणि हो! जमलं तर गुजरातच्या विकासासाठी महाराष्ट्रातल्या युवांवर का अन्याय केला जातो? या का? चं उत्तरही त्यांना विचारलं तर बरं होईल!”
मा. अजित #काका तुमचा हा जुना व्हिडिओ बघितला तर आज तुमच्यात झालेला बदल हा समजण्यापलिकडचा आहे. जे कधीही जमलं नाही ते भाजप फोडाफोडी करून आपल्याच लोकांकडून करून घेतंय, हे दुर्दैव!
आणि हो!
जमलं तर गुजरातच्या विकासासाठी महाराष्ट्रातल्या युवांवर #का अन्याय केला जातो? या #का? चं उत्तरही… pic.twitter.com/gFdugPuuJ6— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 15, 2024
अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना पाडण्याबाबत वक्तव्य केलं होतं. आपल्या कार्यकर्त्यांसमोर आपल्या काकांनाच लक्ष केलं, यावेळी बोलत असाताना त्यांनी “सका पाटलाचा प्रचार करत असताना जॉर्ज फर्नांडिस पापापा म्हणत प्रचार करत होते. तेव्हा पाटील पडले. आता काका का असं लिहून प्रचार करायचा”, असं बोलत अजित पवार यांनी शरद पवार यांना थेट आव्हान दिलं.
“काका का असे करता?”
यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. पुतण्या गद्दार निघाला, अशी एकदा तरी वेळ येईल की काका का असे करता? मात्र यावेळी गद्दारांना माफी नाही, असे खडे बोल जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये याआधी अनेकदा जुंपली होती. अनेकदा अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. अनेकदा अजित पवार यांनी शरद पवार यांना आपल्या वयावरूनही टोकलं आहे.
News Title – Rohit pawar tweet Against Ajit pawar
महत्त्वाच्या बातम्या
“ज्याने तुमच्यासोबत…”, घटस्फोटानंतर सानिया मिर्झाची भावूक पोस्ट
शरद पवार यांच्या चिन्हांबाबत मोठी बातमी, ‘या’ चिन्हासाठी निवडणूक आयोगामध्ये प्रस्ताव
मनोज जरांगे पाटील यांनी तोडली सलाईन, म्हणाले…
उर्फी जावेदचा ‘वेलेंटाईन डे’ लूक तूफान व्हायरल, सोशल मीडियावर ट्रोल
मोठी बातमी! माजी मंत्र्यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, राजीनामा दिला, कारणही सांगितलं