राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकरांचा ऐतिहासिक निर्णय, शरद पवारांना धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ncp Mla Disqualification | राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल (Ncp Mla Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी हा पक्ष अजितदादा यांचाच असल्याचा ऐतिहासिक निकालही राहुल नार्वेकर यांनी दिला. यामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का बसला आहे.

शरद पवारांना धक्का

पक्ष कुणाचा? याबाबतचा निकाल जाहीर केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Ncp Mla Disqualification) निकाल दिला. त्यांनी याबाबतच्या दाखल सर्व याचिका डिसमिस केल्या. त्यांनी अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचा निर्वाळा दिला. त्यांनी शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळ्या. यावेळी राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं आहे.

विधानसभा अध्यक्षांनी यावेळी अतिशय महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. नवनवीन पक्षांसोबत आणि विचारसरणी सोबत हल्ली युती आणि आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार आणि शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले आहेत.

विविध राज्यातीस अशा प्रकरणातील दाखले पाहता विधीमंडळ सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विचारांशी विसंगत भूमिका मांडली आणि सरकार पडले तर तो पक्षाविरुद्ध कार्यवाही होत नाही. कारण त्या पक्षास पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी असते. लोकशाहीत प्रत्येक सदस्याला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं आहे.

“राष्ट्रवादीच्या घटनेबाबत काहीच वाद नाही”

राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. राष्ट्रवादीच्या घटनेबाबत काहीच वाद नाही. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे. अध्यक्ष, वर्किंग कमिटी आणि नॅशनल कमिटी ही पक्षाची निर्णायक पद्धत दर्शवते, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

तसेच शरद पवार गटाने प्रतिनिधी निवडल्याचे कोणतेच पुरावे दिले नाहीत, असंही नार्वेकर यांनी म्हटलं आहे. नार्वेकरांच्या या निकालामुळे शरद पवारांना पुन्हा धक्का बसलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

“पापापा म्हणत पाटील पडले आता काका का म्हणत…”; काका-पुतण्यामध्ये चांगलंच वाजलं

पुणे हादरलं! लॉजवर मुलीसोबत घडला भयंकर प्रकार

“अशोक चव्हाण यांचं अभिनंदन करतो त्यांनी काँग्रेस पक्षावर दावा…”

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!