मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा उपोषणास सुरूवात केली आहे. सगेसोयरे प्रकरणी सरकारने अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठा समाजाची आहे. मात्र सरकारने केवळ अध्यादेश दिला आणि त्यावर कोणतीही भूमिका न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. एका चिमुरडीने देखील मनोज जरांगे पाटील यांना काका पाणी प्या अशी विनवणी केली, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्यास नकार दिला आहे.

ते सहा दिवस झाले कोणतेही औषधोपचार घेत नाही. अंतरवाली सराटीतील नागरिकांनी पाणी पिण्यासाठी विनंती केली. मात्र मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सरकारने अंमलबजावणी केली असेल तरच मी पाणी पितो असं म्हणाले आहेत. गेली सहा दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही, पाणी नसल्याने शरीरात कोणतेही त्राण उरले नाहीत. यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे.

काल मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली होती, मात्र त्यांनी लावलेली सलाईन काढायला लावली. यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे. आता त्यांच्या पोटातही दुखू लागलं आहे. त्यांना डोळे देखील उघडता येत नाही. उपस्थितांनी त्यांना पाणी पिण्याबाबत विनवणी केली आहे. मात्र ते आपली भूमिका पाळून आहेत. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत पाण्याच्या थेंबाला हात देखील लावणार नाही, अशी स्पष्टोक्ती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

गुरूही धावले

मनोज जरांगे पाटील यांचे नारायणगड येथील गुरू महंत शिवाजी महाराज यांना मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत खबर कळताच त्यांनी अंतरवाली सराटी येथे धाव घेतली. यावेळी मनोज जरांगे यांना पाणी दिले मात्र मनोज जरांगे यांनी आपल्या गुरूच्या हातून पाणी पिण्यास नकार दिला. यावेळी मनोज जरांगे यांना पाणी देखील घोटवत नव्हतं.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदीरात महाआरती

जरांगे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त आहे. त्यांना बरं वाटावं म्हणून आता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीरामध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने महाआरती आयोजित करण्यात आली होती.

त्र्यंबकेश्वर येथे पूजा

मनोज जरांगे यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा यासाठी संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षातील कार्यकर्त्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे रूद्राभिषेक केला आहे. त्यांच्या प्रकृतीत बदल होऊन प्रकृती सुधारावी यामुळे ही पूजा करण्यात आली आहे.

News Title – Manoj Jarange Patil health Update

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांचा शिंदे सरकारला गंभीर इशारा

सोनिया गांधी यांनी केली सर्वांत मोठी घोषणा, म्हणाल्या..

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती चिंताजनक; महिलांचा आक्रोश सुरू

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अडकणार लग्नबंधनात!

‘किंग खान’ च्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!