सर्व्हेमध्ये झाला मोठा खुलासा, महिलांना आवडतात ‘अशा’ प्रकारचे पुरुष

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Relationship | असं म्हटलं जातं की महिलांना समजणं फार कठीण असतं. महिलांना कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या गोष्टी नाही आवडत याबद्दल लवकर कळून येत नाही. त्यातच महिलांना कोणत्या प्रकारचे पुरुष (Relationship ) आवडतात याबाबतही लवकर समजून येत नाही. आता नुकताच एक सर्व्हे समोर आला आहे.  

ज्यामध्ये महिलांना नेमके कोणते पुरुष आवडतात किंवा पुरुषांमधली कोणती गोष्ट आवडते याबद्दल खुलासा झाला आहे. महिला नात्यात जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करतात या सर्व बाबतीत या सर्व्हे मध्ये खुलासा करण्यात आला आहे.

महिलांना पुरुषांची कोणती गोष्ट आवडते?

बऱ्याचदा असं होतं की महिला (Relationship ) या एखाद्या पुरुषाला बघून पहिल्याच भेटीत त्याच्याकडे आकर्षित होतात किंवा पहिल्या भेटीनंतर काही काळ गेल्यानंतर त्या पुरुषांकडे आकर्षित होतात. याला “लॉ ऑफ अट्रॅक्शन” असंही म्हटलं जातं. मात्र अशी कोणती गोष्ट आहे की, ज्यामुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात याबाबत अनेक वैज्ञानिक शोधही घेण्यात आले आहेत.

वैज्ञानिकांच्या मते अशी गोष्ट समोर आली आहे की, ज्यामुळे महिला कोणत्या गोष्टीमुळे आकर्षित होतात याबाबत खुलासा झाला आहे. रुटर युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्रज्ञ तथा लेखक हेलेन ई फिशर यांचं असं म्हणणं आहे की, महिला या अभिव्यक्तीच्या आधारावर आपली रुची दाखवतात.

“असे” पुरुष महिलांना आवडत नाहीत

जे पुरुष महिलांवर जबरदस्ती करतात किंवा त्यांच्यावर दबाव आणतात ते पुरुष महिलांना सहसा करून पटत नाहीत. पुरुषाने महिलांना समजून घ्यायला हवे, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे तसेच त्यांना मनमोकळे होता येईल अशी जागा निर्माण करणे, या छोट्या छोट्या गोष्टी महिलांना (Relationship ) पुरुषांकडे आकर्षित करतात.

एक काळ होता, जेव्हा महागडे कपडे आलिशान गाड्या चालवणारे पुरुष महिलांना खूपच आवडायचे. मात्र, एक शोध असाही झाला आहे, ज्यात पुरुष सायकल जरी चालवत असला तरी सहसा महिलांना त्याचा काही फरक पडत नाही. कारण आपले व्यक्तिमत्व हे आपल्या चेहऱ्यावरून झळकत असते. तसेच आपले व्यक्तिमत्व हे आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून झळकत असते. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात अशी खास गोष्ट असायला हवी जेणेकरून आपण समोरच्याचे मन सहज जिंकून घेऊ शकतो.

नात्यात जाताना महिला “ही” गोष्ट बघतात

आपण साधारण पोशाख जरी ठेवला तरी आपली वागणूक ही पाण्यासारखी नितळ असायला हवी. आपल्या बोलण्यात गोडवा असायला हवा. तसेच, महिलांप्रती एक आदर भाव आपल्या बोलण्यातून दिसून यायला हवा. या सर्व गोष्टी महिलांना एका पुरुषाकडे सहजपणे आकर्षित करतात. शेवटी महिलांना कोणीतरी समजून घेणारा साथीदार हवा असतो. 2010 मध्ये एक चकित करणारा शोध घेण्यात आला. ज्यामध्ये असे दिसून आले की, महिलांना बऱ्याचदा आपल्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषांप्रती भावना दिसून आल्या. किंवा ज्यामध्ये महिला आपल्यापेक्षा वयस्क पुरुषांबद्दल लगेच आकर्षित (Relationship ) होताना दिसल्या.

मनोवैज्ञानिक फिफियोना मूर यांचं असं म्हणणं आहे की, महिलांना शक्तिशाली आणि आपल्यापेक्षा जास्त वय असलेले पुरुष जास्त आवडतात. आता सध्याच्या युगामध्ये महिला आणि पुरुषांच्या रिलेशनशिपमध्ये वयाचे अंतर हे फारसे दिसून येत नाही. अधिक वयाचे पुरुष हे अधिक अनुभवी असल्याने महिलांना ते जास्त आकर्षित वाटतात असाही एक शोध घेण्यात आला आहे. कारण वयानुसार व्यक्तीमध्ये समजदारपणा येत असतो. त्यातच दाढी असणारे पुरुष महिलांना अधिक आकर्षक वाटतात, असेही दिसून आले आहे.

News Title :  Women love this kind of men in Relationship

महत्त्वाच्या बातम्या-

मेट्रोनं प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाने पोस्ट करत दिली मोठी गुड न्यूज!

डेब्युमध्येच हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या सरफराजला BCCI कडून मिळालं मोठं गिफ्ट!

गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

‘या’ 3 राशींवर आज लक्ष्मी होईल प्रसन्न!